अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त ठाण्यात अभिवादन

 


ठाणे  : दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाण्यात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


 धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव,जांभळी नाका येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके,  प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे,कार्याध्यक्ष महेश गुंड, सल्लागार प्रसाद वारे,मनोहर वीरकर,कार्यकारणी सदस्य राजेश वारे,संतोष दगडे,अंकुश उघाडे,रमण गोरे आदींसह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून देखील पुण्यतिथीनिमित्त माहिती व जनसंपर्क कार्यालयीन अधीक्षक सुनील परदेशी,उप माहिती व जनसंपर्क  अधिकारी रोशन मंचेकर ,लिपिक संदीप जिनवल यांच्या हस्ते पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले.  


कार्यक्रमाच्या सुरुवात राष्ट्र सेविका समितीच्या सहकार्यांनी दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमाचा ओव्या व आरती गायन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत