ब्रह्मांड कट्टयावर १०वी व १२वी यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व हिंदी मराठी गीतांचा वाद्यवृंदासह कार्यक्रम
ठाणे : ब्रह्मांड कट्टा सामाजिक-सांस्कृतिक मंडळ आयोजित रविवार २०जुलै २०२५ रोजी सांज स्नेह जेष्ठ नागरिक सभागृह येथे १०वी १२ वी यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व हिंदी गीतांचा वाद्यवृंदासह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गणेश घनश्याम यांच्या जी जी म्युझिका प्रस्तुत, "जो जिता व्ही सिकंदर" हा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात गायक चंद्रकांत पवार यांच्या अकेले अकेले कहा जा रहे हो या गाण्याने झाली. क्या गजब करते हो जी हे कविता शेणवी यांनी सुमधुर आवाजात गाण सादर केले.शरद व रंजना या दाम्पत्यांचे इन हवाओ मे..तुमको मेरा प्यार पुकारे हे सुंदर गीत सादर झाले. प्रविण शिंपी यांचे डिस्को डान्सर या गाण्यावर रसिकानी सुंदर ताल धरला. आश्विनी माने हिचे हवाई.,तर संतोष साइल याच्या सोबत दुनिया में लोगो को ही धडाकेबाज गाणी झाली. गणेश घनश्याम यांचे मेरे सपनो की रानी हे प्रसिद्ध गीत,तसेच अश्विनी माने सोबत कुछ कुछ होता है व मराठी गाणे अश्विनी ये ना ही गाणी सादर केली.माय हार्ट इज बिटींग हे राजलक्ष्मी वरदान यांनी तर बडी मुश्किल है अजय कोळी यांनी सादर केले. एनशी नव्वदच्या दशकातील या सुप्रसिद्ध गाण्यांना मुलांनी व रसिकांनी तालासुरात भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाचे संगीत संयोजक किरण गायकवाड, जयंत बगाडे, दिगंबर मानकर आणि टीम हे सर्व संगीत क्षेत्रातील मान्यवर मंडळी होती तर सोनिया गुप्ता यांनी खुमासदार शैलीत माहितीपूर्ण निवेदन केले. किशोर मिरगल यांचे ध्वनी संयोजन होते.
ब्रह्मांड कट्टा सामाजिक- सांस्कृतिक मंडळातर्फे ब्रह्मांड परिसरातील १० व १२ वी उत्तीर्ण झालेल्या तसेच विविध कला जोपासत तसेच प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून प्राविण्य मिळवलेल्या पस्तीस विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक व शैक्षणिक उपयोगी वस्तू देऊन गौरविण्यात आले. कै. नारायण अनंत कुलकर्णी, कु.ऐश्वर्या मांड्या व कै.महादेव यशवंत पाटणकर यांच्या स्मरणार्थ बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली होती.तसेच मॅड ओवर डोनटस फ्रेंचाईजी चे श्री. संतोष डोईफोडे यांच्या वतीने सर्व मुलां 350/- रुपयाचे गिफ्ट कुपन देऊन विशेष सहकार्य केले. दहावीतील विशेष गुण संपादन केलेल्या मध्ये कु.सोमांश राऊत 98%, अर्णव शिंदे 97% तर आदित्य भालेराव याला 96.2% गुण प्राप्त झाले. तर बारावी मध्ये गार्गी कुलकर्णी 93% व निधी पटवर्धन 91% टक्के गुण प्राप्त झाले. प्रतिकूल परिस्थिती त आश्रम शालेत शिकणार आदिवासी पाड्यातील प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्याबदल रौनक सुरकर याचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थ्यी व पालक तसेच संगीत प्रेमी रसिक बहुसंखेने उपस्थित होते. ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव यांनी देणगीदारांचे आभार मानले.
Post a Comment