जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्ट आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न.
कळवा-खारेगाव यथील पारसिक नगर 90 फूट रोडवर जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्ट यांच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भव्य वृक्षारोपण मोहीम शनिवार दिनांक 7 जून रोजी आयोजित करण्यात आली.
मा. आमदार अँड. निरंजनजी डावखरे यांच्या सहयोगाने आणि मा. आमदार श्री. संजयजी केळकर व भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष अँड. संदीप लेले यांचेही या मोहिमेस मार्गदर्शन लाभले. तसेच श्री. सचिन मोरे यांच्या विशेष सहकार्याने जनस्वराज्यचे अध्यक्ष श्री. राजन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर वृक्षारोपण मोहिम यशस्वीरित्या पार पाडली.
मा. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या मोहिमेचे उदघाट्न संपन्न झाले. त्यांच्या हस्ते विभागातील 50 महिलांना तुळशीचे रोप देऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. या मोहिमेतर्गत कळवा खारेगाव येथील ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. जनस्वराज्यच्या माध्यमातून 500 वृक्षांचे रोपण करून त्यांचे संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली होती.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री. राजन पाटील, डॉ. राहुल पाटील, श्री. अमित नाईक, श्री. मंजीत जाधव, अँड. एम. आर. बडगुजर, नोटरी भारत सरकार, श्री. किरण पाटील, श्री. सागर काटकर, श्री. लेखराज फुटाणे व जनस्वराज्यच्या कोअर टीमने केले. तसेच श्री. रवी काळे व श्री. राऊत यांनी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून वृक्षांचे नियोजन व कळवा पोलिसांचे सहकार्य मिळवून देण्याचे विशेष काम केले.
शिवजयंती सोहळा, वृक्षारोपण, आरोग्य शिबीरे, जनजागृती मोहीम असे अनेक कार्यक्रम जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून संपन्न होतात. अध्यक्ष राजन पाटील यांनी विभागातील सर्व नागरिकांनी लोकभिमुख कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवावी व सहकार्य करावे अशी विनंती केली. आमदार श्री. संजय केळकर यांनी जनस्वराज्यच्या सर्वच उपक्रमांचे कौतुक केले. वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
सदर कार्यक्रमासाठी श्री. विलासजी साठे, श्री. मनोहर सुखदरे, श्री. तेजस चंद्रमोरे, श्री. साहिल उगाळे, अँड. सुदर्शन साळवी, श्री. रवी काळे, श्री. परमेश्वर सैगर, श्री. प्रशांत तळवडेकर, डॉ. शैलेश शुक्ला, श्री. जगदीश गौरी, श्री. कमलाकर वरबडे, श्री. पुरुषोत्तम पाटील, ललिता पाटील, दीपिका शिरकर, शोभा कदम, उषा चिंचोलकर, कविता वाळंज, शारदा घोडके, मंदा भोसले, सारिका कुंभार, संगीता हिनकुळे, प्राचार्य संतोष गावडे, प्राचार्य सूर्यकांत उंब्रजकर आदी मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment