त्या कंत्राटदारावर कारवाई करा मराठा क्रांती मोर्चा - सकल मराठा समाजाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

 

ठाणे : ठाणे महापालीकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीतील  प्रभाग क्रमांक चार मधील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या नावाच्या  कमानीची तोडफोड केल्याबद्दल त्याठिकाणी काम करत असलेल्या कंत्राटदारावर कारवाई करून त्याचे नाव काळ्यासुचित समाविष्ट करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा - सकल मराठा समाजाच्या रमेश आंब्रे, अजित चव्हाण आणि राजदीप खानगावकरचा समावेश असलेल्या  शिष्टमंडळाने ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.   

कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ऍड निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून स्थानिक           नगरसेविका स्नेहा आंब्रे यांच्या संकल्पनेतून राजमाता जिजाऊ उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानाच्या माध्यमातून राजमाता जिजाऊना आदरांजली वाहण्यात आली आहे. असे असताना त्याठिकाणी काम करताना कुठल्याही प्रकारची सावधानता न बाळगता कंत्राटदाराने उद्यानाच्या नावाच्या कमानीची तोडफोड करून राजमाता जिजाऊ यांचा अवमान केला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला काळ्या सूचित टाकून त्याच्यावर कारवाई करण्यात याची असे या निवेदनात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत