ठाण्यातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि व्हिडिओ ग्राफर वसंतराव मोडक यांचे निधन

  

ठाण्यातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि व्हिडिओ ग्राफर वसंतराव मोडक यांच आज पहाटे निधन झाले ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, आणि याच क्षेत्रात असलेले कन्या, जावई आहेत.

आपल्या सुमारे 65 वर्षांच्या छायाचित्रणाच्या कारकीर्दीत मोडक काकानी ठाण्याचा जणू इतिहासच चित्रित केला आहे. त्याकाळी 1990च्या सुमारास आपल्याकडे व्हिडिओ टेक्नॉलॉजी अगदी प्राथमिक अवस्थेत होती, त्यावेळी काकानी फोटोग्राफीतून व्हिडिओ क्षेत्रात  प्रवेश केला आणि पुढे ते सदैव आपली माहिती अपडेट करत या क्षेत्रात कार्यरत राहिले. नवीन तंत्रद्न्यान जाणून घ्यायचा त्यांचा उत्साह याही वयात कायम होता. त्यांनी घडवलेले काही विद्यार्थी आज या क्षेत्रात खूप लौकिक मिळवून आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत