करिअरकडे लक्ष द्या सोशल मीडियापासून दूर राहा- माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन

 


ठाणे, प्रतिनिधी - जग अत्यंत वेगवान झाले असून आता एका क्लीकवर माहिती मिळवता येते. तंत्रज्ञान अत्यंत प्रगत झाले असताना याचा सदुपयोग विध्यार्थ्यानी केला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच सोशल मीडिया संदर्भात लक्ष वेधले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानो आपल्या करिअरकडे लक्ष द्या आणि सोशल मीडियापासून थोडेसे दूर राहा असा मोलाचे मार्गदर्शन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी विध्यार्थ्यांना आज केले. 


   दरवर्षीप्रमाणे यंदाही  ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक १२ सिद्धेश्वर तलाव परिसरातील १० वी  व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तरुण मुलींना कॉलेजमध्ये स्वरक्षणासाठी स्वबळावर तयार व्हा असा मौल्यवान सल्ला त्यांनी दिला. सिद्धेश्वर तलाव परिसरात राहणाऱ्या व परिस्थितीशी झुंज देऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी सत्कार करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देत असतात. अशा विध्यार्थ्याच्या मागे शिवसेना नेहमीच उभी असल्याचा विश्वास यावेळी नंदिनी विचारे यांनी पालकांना दिला. या कार्यक्रमासाठी मेघा विचारे, ऋतुजा शिंत्रे, अश्विनी कानोलकर, वनिता कोळी, सुनंदा देशपांडे, गौरी ताम्हणकर, सुवर्णा साळुंखे व इतर पदाधिकारी व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 


१० वी १२ वी गुणवंत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

दहावी उत्तीर्ण

रात्री लोलगे 97% ,

गायत्री एकवाडे 92 % ,

नंदिनी नाईक 91% ,

श्रेया देशमुख 77% ,

यात्था गुप्ता 85% ,

साई पवार 84% ,

सलोनी काणेकर 84%

आर्या यादव 82 % ,

पूर्वा सरफळे 83 %,


बारावी उत्तीर्ण 

करण चव्हाण 81 %


तसेच प्रभागातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत