ठाणेकरांवर बेकायदेशीर पद्धतीने लादलेली टोइंग व्हॅन बंद करा
आधी पार्किंग धोरण राबवा, मग टॉविंग व्हॅनचे नाटक करा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून वाहतूक शाखेला निवेदन
ठाणे- प्रतिनिधी - आज गेल्या सहा महिन्यापासून ठाणे शहरात बंद करण्यात आलेली टोइंग व्हॅन पुन्हा सुरू केल्याने ठाणेकरांमध्ये अतिशय संतापाचे वातावरण पसरले आहे. शहरात पार्किंग करण्यासाठी सोया नसताना ठाणेकरांवर बेकायदेशीर पद्धतीने टोइंग व्हॅन लादली जात आहे. त्यामुळे आधी पार्किंग धोरण राबवा, मग टॉविंग व्हॅनचे नाटक करा असा इशारा देत टोइंग व्हॅन बंद करा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे ठाणेकरांच्या वतीने आज वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांना आज पत्राद्वारे निवेदन देण्यात आले.
ही टोइंग व्हॅन ही पद्धत कायदेशीर असल्याचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले. त्यावर काही पदाधिकाऱ्यांनी टोइंग व्हॅन सुरू करण्याचे टेंडर काढले आहे का ? टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली का? अशा अनेक प्रश्नाचा भडीमार केला. त्यावेळी उपायुक्त पंकज शिरसाट यांच्याकडे कोणतेही उत्तर नसल्याचे दिसून आले. दरम्यान, आम्ही मुदतवाढ दिलेली आहे असे कारण पुढे करून चालढकल केल्याचे निष्पन्न झाले. यावेळी शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख सचिन चव्हाण,प्रदीप शेडगे, रामभाऊ रेपाळे, परिवहन माजी सदस्य राजेंद्र महाडिक, प्रतिक राणे , प्रशांत सातपुते, विजय हंडोरे, रमेश शिर्के, संजय भोई, संजय भिसे, राजू मोरे, राजू शिरोडकर, विभाग समन्वय प्रदीप वाघ,शाखाप्रमुख प्रवीण उतेकर, बाळू, उत्तम सूर्यवंशी ,अनिल धुमाळ, कोशिनकर, संतोष डोंगरे, महिला उपजिल्हाप्रमुख आकांक्षा राणे, शहर संघटक प्रमिला भांगे, ठाणे विधानसभा संघटक विद्या कदम, ठाणे शहर प्रमुख अनिता प्रभू सुनंदा देशपांडे उषा बोराडे सविता धुमाळ रसिका सुनेदार अपर्णा भोईर पौर्णिमा लाड आरती मोरे व इतर शिवसेना पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते.
वाहने उभी करण्यात अडचणी
ठाणे महापालिका व वाहतूक शाखा यांच्या सहमताने ज्या पद्धतीने शहरांमध्ये दुभाजक टाकण्यात आल्याने वाहने उभी करण्यात अडचण होत आहे. नागरिकांसाठी ठीक ठिकाणी पार्किंगची सोय का उपलब्ध होत नाही असा सवाल यावेळी करण्यात आला. त्यामुळे पहिले पार्किंगचे धोरण निश्चित करा. शाळा, कॉलेज, मेडिकल, हॉस्पिटल अशा अतिमहत्वाच्या ठिकाणी टोइंग व्हॅन चालवली जाणार असेल तर आमचा विरोध असणार अशी रोखठोक भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली.

Post a Comment