आदिवासी आरोग्य अभ्यास समिती सदस्यांचा शहापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रास भेट दौरा

 (जिल्हा परिषद, ठाणे):  २१ जून २०२५ रोजी शहापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्र मुसईवाडी, बीट शेणवा, प्रकल्प शहापूर येथे आदिवासी आरोग्य अभ्यास करणाऱ्या समितीचे सदस्य नरेश आकावरू (प्रोजेक्ट ऑफिसर, कळवण), हर्षाली घुले ( पॉलिसी रिसर्चर), ओवीया शंकरन (खुशी बेबी, इंटर्न) यांनी भेट दिली. आदिवासी भागातील बालकांचे पोषण, पूर्वप्राथमिक शिक्षण आणि माता बालसंगोपनावरील आरोग्यविषयक अंमलबजावणीबाबत प्रत्यक्ष पाहणी व संवाद साधण्यात आला.


        भेटीदरम्यान समिती सदस्यांनी अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शिक्षणात सहभागी होत मुलांसोबत संवाद साधला. तसेच गरोदर माता व स्तनदा मातांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांची माहिती घेतली. अंगणवाडी सेविकेच्या मार्गदर्शनाने पोषण ट्रॅकर प्रणाली, सॅम (SAM) मुलांसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, दिला जाणारा नियमित आहार व 'अमृत आहार' याविषयी सविस्तर माहिती घेऊन चर्चा केली.


         या पाहणी दरम्यान अंगणवाडीत शिजवलेला आहार चाखून प्रत्यक्ष चव घेण्यात आली. मुलांसाठी व पालकांसाठी अंगणवाडी स्तरावर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सेविका व मदतनीस यांच्याशी सविस्तर संवाद साधण्यात आला.


         या दौऱ्यात बालविकास प्रकल्प अधिकारी (शहापूर) धनश्री साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी (शहापूर), आरोग्य विभागाचे तालुका पर्यवेक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. समिती सदस्यांनी केंद्रातील कार्याबाबत समाधान व्यक्त केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत