खांबाळे येथे क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थे तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंतांचा सत्कार

 


       वैभववाडी:   क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या वतीने खांबाळे, ता. वैभववाडी येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग प्रभारी तुषारदादा विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सर्टिफिकेट, फोल्डर फाईल आणि संस्थेची दिनदर्शिका देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

             या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या यशाचे कौतुक व्हावे या उद्देशाने संस्थेने  हे आयोजन केले होते. यावेळी शाळेतील 1 ते 7 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

           या कार्यक्रमाला क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग प्रभारी तुषारदादा विश्वासराव,  क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेचे सदस्य - विनोद पवार पाचल, क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष - दीपक पवार, वैभववाडी तालुका अध्यक्ष - जगदीश पवार, क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थाचे सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख राजू पवार, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सरपंच प्राजक्ता कदम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष - प्रियांका पवार, माजी उपसरपंच- गणेश पवार, उमेश पवार, पोलिस पाटील - राखी पवार,अस्मिता चव्हाण, देवस्थान उपसमिती अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार - एकनाथ पवार, तंटामुक्ती अध्यक्ष - लवु पवार, केंद्रप्रमुख- नितीन कदम, डाएट चे भोसले सर, मुख्याध्यापक - जयश्री शेट्ये,शिक्षक - हनुमंत सुतार, प्रशांत भोसले,वैशाली सोलापुरे तसेच ग्रामस्थ नारायण पवार, एकनाथ (अंबाजी) पवार,सुनील पवार,महेश चव्हाण,आनंद पवार, मधुकर पवार,राजू पवार,जयेश पवार,जयसिंग पवार,प्रमोद लोके, सूर्यकांत सुतार, रोहित पवार आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

     संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यापुढेही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले.

      हा उपक्रम गावात प्रेरणादायी ठरला असून पालक आणि ग्रामस्थांकडून संस्थेच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत