समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण !
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणे या ७६ कि.मी.च्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. महामार्गाच्या या टप्प्यामुळे मुंबई ते नागपूर असा थेट प्रवास आठ तासांत शक्य होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आज उपमुख्यमंत्री महोदयांनी समृद्धी महामार्गावर गाडीचे सारथ्यही केले.
याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, सरोज अहिरे, नरेंद्र दराडे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होते.
Post a Comment