वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींचे मालक गायब
ठाणे - विविध गुन्ह्यात वाहतूक पोलिसांच्या नौपाडा उपविभागाने जप्त केलेल्या दुचाकींचे मालक गायब आहेत. या दुचाकी ताब्यात घेण्यासाठी वाहन मालक येत नसल्याने पुढील आठ ते दहा दिवसात या दुचाकींचा लिलाव करण्यात येणार आहे.
नौपाडा वाहतूक शाखेने मागील वर्षी म्हणजेच सन 2024 मध्ये ड्रंक एण्ड ड्राईव्ह विरोधी मोहीम राबविताना एमएच 04 एफई 2310, एमएच 02 बीएल 0020, एमएच 04 एफसी 0322, एमएच 14 इक्स 3056 आणि बेवारस स्थितीतील एमएच 04 जेपी 7387, एमएच 05 एवाय 423, एमएच 04 जेएल 8693, एमएच 03 एसी 2151, एमएच 04 सीएक्स 714, एमएच 04 सीएन 509, एमएच 05 जीक्यू 4835, एमएच 03 एव्ही 2011, एमएच 04 सीपी 5878, एमएच 05 एसी 8339 आणि एमएच 05 एएच 6322 या दुचाकी जप्त केल्या आहेत. या वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पार पडलेली आहे. मात्र, सदर दुचाकींचे मालक अद्याप आपल्या दुचाकींचा ताबा घेण्यास आलेले नाहीत. त्यामुळे ही वाहने सांभाळण्याचे अतिरिक्त काम वाहतूक पोलिसांवर पडले आहे.
यासंदर्भात नौपाडा वाहतूक उपविभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौरी मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, तीन हात नाका येथील उड्डाणपुलाखाली या सर्व दुचाकी उभ्या करण्यात आलेल्या आहेत. या दुचाकींच्या मालकांनी कागदपत्रे सादर करून आपली वाहने घेऊन जावीत. अन्यथा, आठ दिवसानंतर ही वाहने लिलावात काढली जातील. ही वाहने ताब्यात घेण्यासाठी पोलीस हवालदार अभिजीत भाट यांच्याशी +918369570326 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले.
बेवारस वाहनांमुळे पोलिसांना मलेरियाचा धोका
गेले वर्षभर या ठिकाणी ही वाहने उभी आहेत. या वाहनांची निगा राखून परिसरात धूरफवारणी केली जात असली तरी वाहनांमुळे निर्माण झालेल्या अडगळीत डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी पोलिसांना मलेरियाची लागण होण्याचा धोका वाढीस लागला आहे.
Post a Comment