कोकणातील शंभर टक्के शाळा डिजिटल करण्याचा निर्धार!
कोकण पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी कोकणातील शंभर टक्के शाळा डिजिटल करण्याचा निर्धार केला आहे. ह्या उपक्रमाअंतर्गत, रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून डिजिटल साहित्याचे वाटप करण्यात आले. ठाणे शहर भाजप कार्यालय, रेमंड शोरूम जवळ, वर्तक नगर ठाणे पश्चिम या ठिकाणी आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी ठाणे शहर विधानसभेचे आमदार मा. श्री. संजयजी केळकर,भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. संजयजी वाघुले, माजी नगरसेवक मिलिंदजी पाटणकर, मनोहरजी डुंबरे, सुभाष पाटणकर, संचालक मा. श्री. बाबासाहेब दगडे, प्राध्यापक संभाजी शेळके, मा. श्री. सचिन मोरे आदि मान्यवर व शिक्षक उपस्थित होते. कोकणातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच महत्त्वाचा ठरेल असा विश्वास आहे.

Post a Comment