भारतीय नौदलाच्या परिक्षेत ठाणेकर सुपुत्राचा भीम पराक्रम

 


   ठाणे, प्रतिनिधी :  छत्रपती शिवाजी महाराज जनक असलेल्या भारतीय नौदलाच्या कठीण परिक्षेत ठाणेकर सुपुत्र असलेल्या कु. नितेश सुनिल साळवी याने भीम पराक्रम गाजविला आहे. नौदलाच्या परिक्षेत संपुर्ण भारतात चारच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन त्यात कु. नितेश साळवी भारतात पहिला आला आहे. या अद्वितीय यशामुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असुन सर्व स्तरातुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    ठाण्यात वास्तव्यास असलेला कु.नितेश सुनिल साळवी हा बालपणापासुनच साहसी आणि धाडसी वृत्तीचा आहे. त्याचबरोबर विद्वत्ताही त्याच्याठायी ठासुन भरलेली आहे. संपूर्ण भारतामधुन १० विद्यार्थी इंडियन नेव्ही (नौदल) परीक्षेसाठी निवडले गेले होते. त्यात कु. नितेश याचाही समावेश होता. या परिक्षेत अवघे चारच विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढे गेले. त्यात नौदलाच्या सर्व स्पर्धा परीक्षा पास करून कु. नितेश याने प्रथम क्रमांक मिळवला. संपुर्ण भारतात कु. नितेश पहिला आला.अशी किमया करून कु. नितेश याने आपल्या आईवडीलांचे नाव मोठे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत