ठाणे ग्रामीण जिल्हा सीसीटीव्हीच्या नजरेत
ठाणे ग्रामीण पोलिसांचा लोकसहभागातून महाराष्ट्रातील पहिला प्रयोग
ठाणे ग्रामीण भागातील सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याचे काम ठाणे ग्रामीण पोलिसांकडून हाती घेण्यात आले आहे. जिल्हाभरात 45000 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पसरवून जिल्ह्याची सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे काम केले जात आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामीण पोलिसांकडून लोकांच्या सहभागातून 1121 सीसीटीव्हीकॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन झाले. लोकांच्या सहभागातून सुरू करण्यात आलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे.
ठाणे ग्रामीण पोलिसांचे हद्द दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत असल्याने ग्रामीण भागाला सुरक्षा पुरवणे ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. सुमारे 1500 पोलिसांकडून हे आव्हान पेलले जात असतानाच आता त्यांच्या मधला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे उभे राहणार आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. एस स्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागाची सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी अधीक्षक कार्यालयातून जिल्ह्यातील घडामोडींवर थेट वॉच ठेवता यावा याकरिता अधीक्षक कार्यालयात सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील खाजगी शासकीय निमशासकीय ठिकाणी भेटी देऊन पोलिसांनी तेथील कार्यान्वयेत सीसीटीव्ही यंत्रणा नियंत्रण कक्षाला जोडली आहे. त्यासोबतच महामार्ग, ज्वेलर्स, हॉटेल्स, गोडाऊन, ग्रामपंचायत, सोसायटी, पीडीएफसी पेट्रोल पंप, घराबाहेरील कॅमेरे, शाळा, एसटी स्टँड, रिसॉर्ट असे सारे भाग पोलिसांच्या नजरेत घेतले आहेत. सध्या सीसीटीव्ही कक्षाशी 1121 ऑनलाइन कॅमेऱ्यांचे अक्षेस सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाशी जोडले असून लवकरच 4500 हजार कॅमेऱ्यांचा टप्पा पार केला जाईल असे अधीक्षक डॉ. स्वामी यांनी सांगितले. तपासकामी सीसीटीव्ही यंत्रणा पोलिसांसाठी मदतगार साबित झाले आहे. या यंत्रणेमुळे तपास कामाला वेग आणि यश येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या यंत्रणेचे जाळे जिल्हाभर पसरावे यातूने लोकांच्या मदतीने काम सुरू केले आहे. त्यासाठी काही दिवसांपासून जिल्हाभर सर्व्हे सुरु होता. गावकरी, मालक, सरपंच, दुकानदार, पोलिस पाटील अशांच्या भेटी घेऊन एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षेसाठी या उपक्रमाची माहिती त्यांना देण्यात येत होती. नियंत्रण कक्षाचे उद्घाटन प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी एस स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
लोकांच्या परिसरात असलेल्या दुकानदार, शासकीय, नियम शासकीय कार्यालय, हॉटेल्स, ज्वेलर्स यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे अँक्सेस इंटरनेट द्वारे पोलीस सीसीटीव्ही नियंत्रण कक्षासोबत जोडले आहेत. त्यामुळे तेथील सर्व परिसर ग्रामीण अध्यक्षकांच्या कार्यालयामध्ये 24 तास लाईव्ह दिसतो.
सीसीटीव्ही कॅमेरामन साठी पोलीस प्रशासनाकडून कोणताही खर्च न करता जनतेच्या मालकीच्या सीसीटीव्ही यंत्रणेचा उपयोग करून घेण्यात आला आहे.
या कॅमेऱ्यामुळे जनतेला मदत वाहतूक कोंडी गुण्याचा तपास महिला सुरक्षा संस्था स्पर्धा लक्ष ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मदत होणार आहे.
Post a Comment