कचराकोंडी सोडविण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक
मुख्यालयासमोर ढोल बजावत अनोखे धरणे आंदोलन
ठाणे- (प्रतिनिधी): ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यावर संपूर्णपणे राज्यशासनाचे नियंत्रण आहे.महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन नागरिकांची समस्या ऐकून घेत नसल्याने सर्वसामान्य जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाणेकर नागरिकांना खड्डेमुक्त मुक्त रस्ते ,पिण्याचे पाणी, घनकचरा यासारख्या मूलभूत सुविधा मिळणे देखील मुश्किल झाले आहे. महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही त्यातच शहरात कचराकोंडी झाल्याने काँग्रेस च्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनास प्रदेश सरचिटणीस ठाणे प्रभारी चंद्रकांत पाटील,प्रदेश सचिव संतोष केणी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की काँग्रेस पक्ष निवडणुका होवोत अथवा न होवोत सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत राहणार आणि सत्ताधारी आणि प्रशासनाचा भ्रष्टाचार बाहेर काढणार
यावेळी शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की मागील दहा दिवसापासून शहरातील कचरा पूर्णपणे उचलला गेला नाही.सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने दहा वर्षाच्या निविदेच नियोजन करणारे प्रशासन दहा दिवसाचा कचरा उचलू शकत नाही हे महानगरपालिकेच तसेच सत्ताधाऱ्यांच अपयश आहे. गेली 25 वर्ष सत्ता असून कुठलीही ठोस उपाययोजना करू शकलेले नाही त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार सुरू असून शहरातील कचराकोंडीचा प्रश्न न सुटल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल म्हणूनच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर ढोल वाजवत अनोखे आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात विविध घोषणांचे फलक घेत सत्ताधारी तसेच प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत ढोल वाजवून मुख्यालयाचा परिसर दणाणून सोडला तसेच याबाबत ठाणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले यावेळी ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे,महिला अध्यक्ष स्मिता वैती,शिल्पा सोनो ने, सेवादल अध्यक्ष रवी कोळी, महेंद्र म्हात्रे,हिंदुराव गळवे,शिरीष घरत,निशिकांत कोळी ,स्वप्नील कोळी,युवक काँग्रेस चे आशिष गिरी,विनीत तिवारी,स्वप्नील भोईर,महेश पाटील, जनाबा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment