बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स अँड रिटायरर्स असोसिएशन सभा संपन्न
ज्येष्ठांनी सायबर गुन्हेगारांपासून सावधता बाळगावी - व. पो. निरी. प्रकाश वारके
ठाणे : बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स अँड रिटायरर्स असोसिएशन (मुंबई आणि गोवा) सदस्यांची सर्वसाधारण सभा बुधवारी ठाण्यातील वसंतराव नाईक सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठांच्या होतअसलेल्या आर्थिक फसवणुकीबाबत जागरुक करत कोणत्याही अनोळखी इसमाच्या बोलण्यात गुंतून त्यांना कोणतीही वैयक्तिक माहिती देवू नये तसेच वेळीच सावधानता बाळगून पोलिसांना याबाबत माहिती कळविण्याचे आवाहन केले. या सर्वसाधारण सभासदांची सभा एक भव्य यश होते. या बैठकीचे अध्यक्षपद वरिष्ठ उपाध्यक्ष कॉम. सुनील सुशीलन यांनी भूषवले. या सभेला 200 हून अधिक सदस्य सहभागी उपस्थित होते. केवळ ठाण्यातीलच नव्हे तर पनवेल, नवी मुंबई, बोरिवली, अंधेरी, मुलुंड आणि भांडुप अशा दूरदूरच्या ठिकाणांहून सदस्य आले होते. बँक ऑफ इंडिया, ठाणे शाखेचे मुख्य व्यवस्थापक सुनील नामजोशी हे सुद्धा सभेला उपस्थित होते.
सभेची सुरुवात श्रीमती गीता बर्वे यांनी सादर केलेल्या श्री गणेश वंदनेने झाली. अर्थ आणि डिजिटायझेशन तज्ज्ञ श्री. चंद्रशेखर ठाकूर यांनी स्लाईड शोद्वारे विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीं बद्दल विवेचन केले. सदस्यांसाठी तेअत्यंत फायदेशीर होते.
ठाणे शहराच्या सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश वारके यांनी स्लाईड शोद्वारे ऑनलाईन फसवणूक करणार्यांच्या कार्यपद्धतीबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सदस्यांना ऑनलाइन व्यवहारांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीबद्दल माहिती दिली. जे ऑनलाईन फसवणुकीला सर्वाधिक बळी पडतात. दोन्ही व्याख्याने सदस्यांसाठी अत्यंत उपयुक्त होती.
के. एम. दस्तूर रीइन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वरिष्ठ उपाध्यक्षा अनाहिता डावर आणि उपमहाव्यवस्थापक श्रीधर भट यांनी गो डीजीटच्या 2 नवीन समूह विमा योजनांबद्दल माहिती सादर केली, ज्या विशेषतः बँक निवृत्तांसाठी डिझाइन केलेल्या आहेत ओपीडी पॉलिसी आणि सायबर सुरक्षा पॉलिसी. सुश्री अनाहिता डावर यांनी स्लाईड शोच्या द्वारे दोन्ही विमा योजनांचे तपशीलवार वर्णन केले. सदस्यांनी काही प्रश्न विचारले ज्यांची उत्तरे के. एम. दस्तूरच्या अधिकार्यांनी त्वरित दिली.
त्यानंतर एचडीएफसीलाइफच्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह श्रीमती मयुरिका नंदी यांनी निवृत्त बँकर्ससाठी ऑफर केलेल्या विविध विमा पॉलिसी तसेच बँक निवृतांसाठी कऊऋउङळषश मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. -खइझ-ठउ, महाराष्ट्राच्या राज्य सचिवपदी कॉम. शेखर कदम यांची एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
बँकेच्या निवृत्त कर्मचार्यांनी पेन्शन सुधारणा आणि इतर मुद्द्यांसाठी केलेल्या दीर्घकाळाच्या संघर्षाची तसेच या संदर्भात भविष्यातील कार्यवाहीची माहिती सरचिटणीसांनी सदस्यांना दिली. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. सभेच्या आयोजनासाठी साठी बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स अँड रिटायरर्स असोसिएशनचे कोषाध्यक्ष कॉ. दिलीप धरनाईक आणि कार्यकारिणी सदस्य कॉ. दिलीप चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. आम्ही त्यांचे आभार मानतो. भविष्यात अशाच सभांचे आयोजन ठाणे व इतरत्र करण्याचे आमचे प्रयोजन आहे. संघटनेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सदस्यांच्या सात्यतपूर्ण सहभागाची अपेक्षा आहे.
Post a Comment