दोस्ती फाऊंडेशनचे १० फेब्रुवारीला जिद्द संमेलन
ठाण्यातील दोस्ती फाऊंडेशन संस्थेच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही सोमवार, १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत एन.के.टी. कॉलेज सभागृह, खारकर आळी, कोर्टनाका* येथे दिव्यांग मुलांचे जिद्द संमेलन आयेजित करण्यात आले आहे.
ठाणे शहरातील दिव्यांग, मुक बधीर विद्यार्थ्यांच्या १० शाळांचा सहभाग जिद्द संमेलनात होणार आहे. जिद्द संमेलनात विविध नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम दिव्यांग विद्यार्थी सादर करणार आहेत.
दिव्यांग मुलांच्या कला गुणांना प्रोत्साहन मिळावे. या करीता दोस्ती फाऊंडेशन जिद्द संमेलनाचे आयोजन करीत असते. अशी माहिती दोस्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश कोळी यांनी दिली असुन जिद्द संमेलन यशस्वी करण्यासाठी दोस्ती फाऊंडेशनचे उपाध्यक्ष प्रथमेश जाधव, खजिनदार महेश दळवी, सचिव वैभव घोगले, सदस्य विनय घोगले, सदस्या सोनाली योगेश कोळी, सदस्या मानसी महेश दळवी आदी परिश्रम घेत आहेत.
Post a Comment