प्रसिद्ध विकसकांकडील विविध पर्याय पाहून स्वप्नातील घर खरेदी करण्याची अनोखी संधी जितेंद्र मेहता

 



मुंबई/ठाणे : प्रसिद्ध विकसकांनी सुरू केलेल्या विविध प्रशस्त व सर्वसुविधायुक्त गृह प्रकल्पातील शेकडो घरांचे पर्याय पाहून स्वप्नातील घर खरेदी करण्याची अनोखी संधी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. `क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे' यांच्या वतीने ठाण्यातील कोलशेत रस्त्यावरील हायलॅण्ड गार्डन येथे ७ ते १० फेब्रुवारीपर्यंत भरणाऱ्या भव्य ठाणे प्रॉपर्टी प्रदर्शन-२०२५ मध्ये सुनियोजित गृह प्रकल्पांची माहिती उपलब्ध होईल. या प्रदर्शनात एकाच ठिकाणी प्रसिद्ध विकसक, बांधकाम व्यावसायिक आणि कर्जपुरवठादार संस्थांची भव्य दालनांमध्ये आकर्षक योजना व गृह प्रकल्पांची ग्राहकांना मिळू शकेल, अशी माहिती `क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे'चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली.


`क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे'च्या प्रकल्पाला ग्राहकांनी का भेट द्यायला हवी?
१. वैविध्यपूर्ण घरांची श्रेणी : या प्रॉपर्टी प्रदर्शनामध्ये माफक किंमतीत अपार्टमेंट, व्हिला, रो-हाऊस आणि व्यावसायिक जागा उपलब्ध असतील. प्रत्येक गृह प्रकल्पातील विविध वैशिष्ट्ये, प्रकल्पातील सुविधांची माहिती मिळेल. त्यामुळे ग्राहकांना विविध पर्यायातून उत्तम घराची निवड करता येईल.
२. प्रसिद्ध विकसक व बांधकाम व्यावसायिकांचा समावेश : या प्रदर्शनात ठाणे शहर व परिसरातील प्रसिद्ध विकसक व बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले असून, त्यांच्याकडील अधिकृत व विश्वासार्ह प्रकल्प ग्राहकांना पाहावयास मिळतील. या प्रकल्पांबरोबरच भविष्यात सुरू होणाऱ्या गृह व व्यावसायिक प्रकल्पांची सविस्तर माहिती मिळू शकेल. त्यातून ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध होतील.
३. विशेष योजना व सवलती : या प्रदर्शनात बहुसंख्य विकसक व बांधकाम व्यावसायिकांकडून किंमतीमध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे. त्याचबरोबर आपल्या घरासाठी ग्राहकांना थेट विकसक वा विकसकांच्या प्रतिनिधीबरोबर संवाद साधता येईल. त्यातून ग्राहकांना घरखरेदीवर पैशांची बचत करता येईल.
४. लाडकी बहीण : `क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे'च्या वतीने या प्रदर्शनात घर खरेदी करणाऱ्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सादर करण्यात आली असून, घराच्या किंमतीच्या अवघ्या २० टक्के किंमतीत घरांची नोंदणी करता येईल. तसेच त्यावर आकर्षक सवलतही दिली जाणार आहे. प्रदर्शनाच्या कालावधीच्या ४ दिवसांत संपूर्ण रक्कम भरणाऱ्या बहिणीला योजनेचा लाभ मिळणार आहे.
५. कर्जपुरवठादार संस्था व गृह कर्जाचे पर्याय : या प्रदर्शनात आघाडीच्या कर्जपुरवठादार संस्थांची दालने असून, त्यात गृह कर्जासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील. या दालनात गृह कर्ज क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळू शकेल. तसेच ग्राहकांना विविध पर्यायांमधून कर्जाचे दर व अटींची तुलना करून योग्य कर्जपुरवठादार संस्थेची निवड करता येईल. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या ग्राहकांना कर्जपुरवठ्यासाठी अर्जही करता येईल.
६. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सल्ला : `क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे' यांच्या अनुभवी सदस्यांकडून आणि बांधकाम व्यवसायातील तज्ज्ञांकडून घर खरेदीसाठी इच्छूक ग्राहकांना मार्गदर्शन व सल्ला दिला जाईल. घरासारखी मालमत्ता खरेदी करण्यासाठी आवश्यक कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती मिळू शकेल. त्यातून घर खरेदीची प्रक्रिया सहजसोपी होईल.
७. संपर्कासाठी संधी : या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना इतर नागरिक, विकसक आणि बांधकाम व्यवसायातील तज्ज्ञांबरोबर संपर्क साधण्याची संधी उपलब्ध होत आहे. प्रदर्शनातून उपलब्ध होणाऱ्या माहितीतून भविष्यातील योजना व स्वत:च्या नोकरी-व्यवसायासाठी उपयोग होऊ शकेल.  
८. ग्राहकांना सुविधा व वेळेची बचत : `क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे'च्या प्रॉपर्टी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर, एकाच ठिकाणी प्रसिद्ध विकसकांचे गृहप्रकल्प व कर्जपुरवठादार संस्थांचा पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे ग्राहकांना घराचा शोध घेताना वेळेची बचत होऊ शकेल.
`क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे' हा ठाणे व परिसरातील घराच्या खरेदीसाठी इच्छूक ग्राहक व कुटुंबांसाठी उत्तम पर्याय असून, या ठिकाणी एकाच ठिकाणी विविध व आकर्षक सुविधा उपलब्ध असलेले गृह प्रकल्प, सवलतीतील कर्जयोजना आदींचा लाभ घेता येईल. या प्रदर्शनाला ग्राहकांनी आवर्जून भेट दिल्यास ग्राहकांच्या वेळेची बचत होईल. तसेच त्यांच्या स्वप्नवत घराचे स्वप्नही पूर्ण होईल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत