अतिक्रमण विभागाच्या वतीने कोपरखैरणे विभागात निष्कासनाची कारवाई

 


       नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कोपरखैरणे विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.         

         नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत 1श्री. भरत दोषी, फ्लॅट नं. बी-1302, भू.क्र.17, सेक्टर-14, कोपरखैरणे, नवी मुंबई येथील अनधिकृत पत्राशेडला महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 5अन्वये नोटीस बजावून हटविण्यात आली. 2) श्री. अब्दुल अजीज ए. रजाक पटेल, घर नं.23, खैरणेगाव, तलावाशेजारील अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर तोडक कार्यवाही करण्यात आली व संबधितांकडून अनधिकृत बांधकाम हटविणेपोटी रू.25,000/- वसूल करण्यात आले.

सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होतेया धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. सुनिल काठोळे व विभाग कार्यालयातील (अतिक्रमण विभागातील) अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. मुख्यालय स्तरावरून पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आलेला होता. तसेच सदर कारवाईसाठी 07 मजूरइलेक्ट्रॉनिक हॅमर - 02, गॅस कटर 01, पिकअप व्हॅन 01 वापर करण्यात आले.

       तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत