ठाण्यात दिव्यांग संघटनेची जोरदार निदर्शने ,दरमहा 6 हजारांची पेन्शन देण्याची मागणी

 


ठाणे - घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सरकार दरबारी खेटे घालूनही घरकुल न मिळाल्याने कन्नड तालुक्यातील एका दिव्यांगांने आत्महत्या केली. त्या निषेधार्थअपंग साधना संघ या दिव्यांग संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीराम पाटणकर आणि अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे निमंत्रक मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुक खान, महिला अध्यक्ष शबनम शहबुद्दीन रैन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

 त्रिंबक धोत्रे , नेवपूर पिशोर,  तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दिव्यांगाने दिव्यांगांच्या योजनांची अंमलबजावणी होत नाही, दिव्यांगांना घरकुल मिळत नाही, दिव्यांग शेतकरीची कर्जमाफी होत नाही या कारणाने सुसाईड नोट लिहून तसेच व्हॉइस रेकॉर्डिंग करून पैठणच्या जायकवाडी धरणात  आत्महत्या केली. योजनांचा लाभ मिळत नसल्याने  महाराष्ट्र बँकेकडून घेतलेले कर्ज परतफेड होऊ शकत नाही, अशा निराशेमध्ये या दिव्यांग शेतकऱ्याने पैठणच्या जायकवाडी धरणात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या  त्रिंबक धोत्रे यांच्या मंत्रालय समोर पुतळा उभारण्यात यावे.; दिव्यांगांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी;  सदरील दिव्यांगाची संपूर्ण कर्जमाफी करावी;  विशेष बाब म्हणून घरकुल देण्यात यावे;  शेतकरी आत्महत्या म्हणून सर्व योजना मिळाव्यात;  हुतात्मा त्रिंबक धोत्रे यांच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी देण्यात यावी, राज्यातील तमाम दिव्यांगांना सन्मानाने जीवन जगण्यास सरसकट ६०००/- दरमहा पेन्शन द्यावी त्या बाबत शासनाचे आवश्यक कायदेशीर आदेश द्यावेत , आदी मागण्या निदर्शकांनी केल्या.
       
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या वतीने तहसीलदार (महसूल) रिवेन लेंबे सदरचा निवेदन दिले या वेळी अपंग साधना संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीराम पाटणकर, रजिया चंपा, अखिल भारतीय दिव्यांग सेनाचे मुख्यनिमंत्रक मोहम्मद युसूफ मोहम्मद फारूक खान, महिला अध्यक्ष शबनम शहबुद्दीन रैन उपस्थित होते
या मागण्या, ०८.०२.२०२५ मान्य न झाल्थास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मयत दिव्यांग त्रिंबक धोत्रे दिव्यांगाचा दशक्रिया विधी व तेरावे घालण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत