श्री माँ बाल निकेतनमध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षातील 37 वे शालांतर्गत वार्षिक प्रदर्शन
ठाणे - ठाणे शहरातील कोपरी येथील सुवर्ण महोत्सव हायस्कूल श्री माँ बाल निकेतनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही शालांतर्गत वार्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यंदा शाळेचे 37 वे वार्षिक प्रदर्शन होते.
सदर 37 व्या शालांतर्गत वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यशन्सच्या संस्थापिका दिव्य श्री तारा माँ यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
या शालांतर्गत वार्षिक प्रदर्शनामध्ये श्री माँ बाल निकेतन हायस्कूल मधील सर्वच वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. विविध चित्तवेधक प्रतिकृतींची (मॉडेल) मांडणी प्रदर्शनामध्ये केली आहे, त्याचे सर्वांनी कौतुक केले.
सदरील शालांतर्गत वार्षिक प्रदर्शनाच्या उपक्रमाला श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स्चे चेअरमन श्री बालगोपाल, सेक्रेटरी रमेश जोशी, विश्वस्त मिस मंजू तेजवानी, श्रीमती चित्रा अय्यर, प्रिन्सिपॉल श्रीमती सेजल नारंग, श्रीमती लक्ष्मी अय्यर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रदर्शन पालकांसाठी खुले ठेवण्यात आले. सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शाळेला साजेशी सजावट करण्यात आली होती. प्रदर्शनात विद्यार्थी-विद्यार्थीनींचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिक्षकांसह सर्वच कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment