शिवसेनेने साजरा केला ममता दिन
प्रतिनिधी - माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना शाखा आझाद नगर १, आनंद पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी ठाण्यात ममता दिन साजरा होत असतो. यंदाही स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे चौकामध्ये ममता दिन साजरा केला. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी माँसाहेबांना पुष्पहार अर्पण करून गरीब नागरिकांना खाऊ वाटप करण्यात आला. त्यावेळी ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, ठाणे जिल्हा महिला उप संघटक महेश्वरी संजय तरे, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, उप शहर प्रमुख वासुदेव भोईर, चंद्रकांत नार्वेकर, आझादनगर शाखेचे शाखाप्रमुख संतोष दंत, किशोर सुर्वे, राजु महाडीक, दादु शिंदे, महाराष्ट्र कोळी समाज संघ सोलापुर जिल्हा अध्यक्ष संजीव कोळी, उप शाखाप्रमुख जयवंत गोविले, शहर संघटक प्रमिला भांगे, मंजिरी ढमाले, माजी नगरसेविका, नंदिनी विचारे, भानुमती नरेश पाटील, महिला विभाग संघटक वैशाली मोरे, नंदा कोथळे, संपदा उरणकर, शाखा संघटक जयश्री बामगुडे, अपर्णा भोईर, सुवर्णा साळुंखे, महिला उप विभाग संघटक कविता नार्वेकर, राजश्री सुर्वे, अनुराधा चव्हाण, रसिका सुबेदार, सुनिता डे, मयुरी कदम, उप शाखा संघटक, स्मिता सकपाळ, ठाणे विधानसभा क्षेत्र संघटीका विद्या कदम, विभाग प्रमुख राजु मोरे, प्रशांत सातपुते, उप विभाग प्रमुख सत्यवान कदम, नंदुकुमार गिरी, युवा सेना शाखाप्रमुख सागर माने, बौध्द नागरीक सेवा मंडळाचे मनोहर बच्छाव, नामदेव जगदाळे, निलेश कदम, सुनिल भोईर, संतोह गवई, जितेंद्र राणे आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
Post a Comment