६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा ठाणे केंद्रातून 'वेटलॉस' प्रथम
मुंबई-६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ठाणे केंद्रातून ठाणे आर्ट गिल्ड या संस्थेच्या वेटलॉस या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच कलासरगम, ठाणे या संस्थेच्या दानव या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे ठाणे केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
रामदास शेवाळे प्रतिष्ठान या संस्थेच्या बेबी या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक संतोष वेरुळकर (नाटक- वेटलॉस), द्वितीय पारितोषिक सुनिल गोडसे (नाटक- दानव), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक-ओसपणाच्या कोस कोस), द्वितीय पारितोषिक - सिध्देश नांदलस्कर (नाटक- याचसाठी केला होता अट्टाहास), नेपथ्य प्रथम पारितोषिक सचिन गावकर (नाटक- वेटलॉस), द्वितीय पारितोषिक सुनील गोडसे (नाटक-दानव), रंगभूषाः प्रथम पारितोषिक टिम कलादर्पण (नाटक-ओसपणाच्या कोस कोस), द्वितीय पारितोषिक दिपक लाडेकर (नाटक-दानव) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक धनंजय कुलकर्णी (नाटक-दानव) व हर्षदा बोरकर (नाटक-वेटलॉस), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे सिध्दी बोंद्रे-जोग (नाटक- कडीपत्ता), स्नेहल नांदवडे-शिंदे (नाटक- बेबी), सुनिता फडके (नाटक- दानव), भक्ती प्रधान (नाटक-स्पायडरमॅन), तन्वी पाटील (नाटक- सीता मरण), मंगेश भिडे (नाटक-वेटलॉस), योगेश खांडेकर (नाटक-कृष्णवीवर), अर्चिस पाटील (नाटक- चोर नव्हता आमचा बाप) डॉ. प्रणित फरांदे (नाटक-याचसाठी केला होता अट्टाहास), चेतन पवार (Black is Beautiful)
५ डिसेंबर, २०२४ ते १३ जानेवारी, २०२५ या कालावधीत डॉ. काशिनाथ घाणेकर (मिनी) नाट्यगृह, ठाणे येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. ठाणे केंद्र समन्वयक म्हणुन ठाण्यातील तरुण रंगकर्मी प्रफुल्ल गायकवाड यांनी यशस्वीरीत्या कामगिरी पाडली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. सुभाष भागवत, श्रीमती अंजली केतकर आणि रामदास तांबे यांनी काम पाहिले.
आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले
सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी प्रथम व द्वितीय आलेल्या नाटकांच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
Post a Comment