क्षयरोगमुक्त भारत करण्यासाठी जिल्हा क्षयरोग केंद्र, ठाणे कार्यालयांतर्गत विविध उपक्रम व योजना

 


ठाणे : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या धोरणानुसार सन 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे योजिले आहे. जिल्हा ठाणे मधील क्षयरुग्ण परिणामकारक बरे होण्याची टक्केवारी सन 2023 - 95 टक्के व सन 2024 - 97 टक्के अशी आहे.  

सदर धोरणाचे उद्दिट्य साध्य करण्यासाठी शासनाच्या जिल्हा क्षयरोग केंद्र, ठाणे कार्यालया अंतर्गत ठाणे जिह्यात खालील उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. यात मोफत क्ष-किरण, अत्याधुनिक सिबीन्याट तापासणी व उपचार उपलब्ध आहेत. समाजातील कोणत्याही व्यक्तीने क्षयरुग्ण कळविल्यास 500 मानधन दिले जाते. खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांनी निदान झालेला क्षयरुग्ण कळविल्यास 500 व उपचार पूर्ण केल्यास 500 मानधन दिले जाते.  18 वर्षावरील व्यक्तींना क्षयरोग प्रतिबंधक बी. सी. जी. लसीकरण मोफत दिले जाते.  क्षयरोग मुक्त ग्राम पंचायत उपक्रमांतर्गत सन 2023-24 मध्ये 75 पैकी 41 ग्राम पंचायती क्षयरोग मुक्त घोषित करून त्यांना मा. जिल्हाधिकारी ठाणे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांचा पुतळा व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे आदी उपक्रमांचा समावेश आहे.  

सदरील योजनेची जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेऊन या कार्यक्रमात लोक सहभाग वाढवावा असे आवाहन डॉ. मुंजाळ आशा सोपानराव, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, ठाणे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत