एकाच दिवशी 100 शस्त्रक्रिया यशस्वी

  


   बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात

                                                

   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजन


             ठाणे (जिमाका) -* 'माता आणि बाल' यांचा सर्वांगीण आरोग्याचा हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे केंद्रबिंदु असून या ध्येयाला स्मरून ठाणे जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या प्रेरणेतून विठ्ठल सायण्णा सामान्य रुग्णालय ठाणे येथे 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम' अंतर्गत एकाच दिवशी शंभर लहानग्यांवर विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या.

मानवी शरीर हे एका वृक्षासारखे असते. जसे त्याचे वय वाढत जाते, तसे ते थोडे कमकुवत होत जाते. अश्यात ते बाल्यअवस्थेत असतांनाच त्याची निगा राखणे आवश्यक आहे. हा विचार करून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एकाच दिवशी शंभर मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आणि उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुला मुलींच्या हर्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेली बोट, फायमोसिस, मान पोटाची गाठ अशा तब्बल 100 शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या. शस्त्रक्रिया एकाच दिवसात करायची असल्यामुळे दोन दिवस अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हील रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्या खाण्या पिण्याची आणि राहण्याची संपूर्ण सोय रुग्णालयाने उत्तम केली होती. के ई एम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ.संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या शस्त्रक्रिया पार पडल्या.

यासाठी सायन रुग्णालयाच्या टीम ने विठ्ठल सायण्णा सामान्य रुग्णालयाच्या टीम बरोबर समन्वय साधून हे शिवधनुष्य पेलले. अति. जिल्हाशल्यचिकित्सक डॉ धीरज महंगाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (ब.स) डॉ मृणाली राहूड, अधिसेविका श्रीम प्रतिभा बर्डे, विनोद जोशी, रोशन पाटील यांनी सर्व पालकांचे उत्तम मार्गदर्शन केले व संपूर्ण शिबिर सुरळीत पार पडेल याकडे जातीने लक्ष देऊन उत्तम नियोजन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत