पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांसाठी रविवार, ०८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम




        ठाणे  : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार ०८ डिसेंबर, २०२४ रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी सर्व्हेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत ० ते ५ वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. राज्यात सन १९९५ पासून दरवर्षी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येते.


        ठाणे महापालिका क्षेत्रात, एकूण १२७८ बूथवर ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेचे २५५६ कर्मचारी कार्यरत असतील. गेल्यावेळी झालेल्या मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रात, ० ते ०५ या वयोगटातील ०१ लाख ७८ हजार ८२४ बालकांना लस देण्यात आली होती.


            ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रामध्ये ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा लाभ पालकांनी ० ते ५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत