भातसा प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
ठाणे (जिमाका) :* भातसा प्रकल्पात रब्बी हंगाम राबविण्यास पाणीसाठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी पाच पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. रब्बी हंगामात गहू, चना, तूर, कापूस, मिरची व इतर चाऱ्यांच्या पिकांना कालव्याचे प्रवाही / कालव्यावरील नदी- नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनाद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी अर्ज मागणी नमुना नं. ७ दि. १५ डिसेंबर २०२४ पूर्वी संबंधीत उपविभागीय/शाखा कार्यालयास सादर करावे, असे आवाहन भातसा धरण व्यवस्थापन विभाग भातसानगरचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
भातसा मोठा प्रकल्प उजवा मुख्य कालवा किमी १.०० ते ५४.०० व डावा कालवा १.०० ते २.०० मधील लाभक्षेत्रातील व त्यावरील सर्व वितरिका, अधिसूचीत नदी नाल्यावरील लाभधारकांनी पाणी अर्ज नमुना ७ अ, ७ ब कोरे फॉर्म संबंधीत उपविभीय/शाखा कार्यालयात मिळतील.
अर्ज मिळण्याचे कार्यालय / सिंचन शाखा कार्यालय - अ) भातसा प्रकल्प, सहा. अभि. श्रे.-१, भातसा उजवा कालवा उपविभाग, शहापूर जि.ठाणे (भातसा उजवा तीर कालवा कि.मी.२ ते ५४).
लाभक्षेत्रातील गावांची नांवे - शहापूर तालुका :- साजिवली, खुटाडी, सरलांबे, अर्जुनली, खरीवली, तुते, आवरे, कांबारे, कवडास, बामणे, चेरपोली, शहापूर, गोठेघर, वाफे, कळंभे, वेहळेली खातिवली, भातसई, वासिंद दहागांव.
भिवंडी तालुका :- सारमाळ, साने, पाली, जांभिवली (प.) पच्छापूर, महाप, शिरगांव, तुळशी, शिरोळा, दाभाड, जाभिवली (को.) चाणे, झिडके, खातिवली, वेढेगांव, वेढेपाडा, सावरोली, (कॉ.), घोटगाव, कासणे, खानीवली, तळवली, कोशीबी, कांदळी, कळंबोली, वडवली, भोकरी, डोहाळे, उंबरखांड, मॉहडूळ, नेवाडे.
अर्ज मिळण्याचे कार्यालय / सिंचन शाखा कार्यालय - ब) भातसा प्रकल्प सहा. अभि. श्रे.-१, भातसा उजवा कालवा उपविभाग, शहापूर जि.ठाणे (भातसा डावा तीर कालवा कि.मी. १ ते 2 सावरशेत.)
लाभक्षेत्रातील गावाची नावे - सावरशेत.
अर्ज मिळण्याचे कार्यालय / सिंचन शाखा कार्यालय - क) भातसा नदी उपविभागीय अभियंता, भातसा डावा कालवा, उपविभाग शहापूर, जि. ठाणे.
लाभक्षेत्रातील गावांची नांवे - भातसा उजव्या व डाव्या तीरावरील गावे.
नमुना नं.७ चा अर्ज प्राप्त झालेल्या अर्जधारकांना विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूरी देण्यात येणार आहे.
रब्बी हंगाम २०२४-२५ संभाव्य पाणी पाळी नियोजन
• कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी - 20.12.2024 ते 11.01.2025 - 22 दिवस.
• कालवा बंद कालावधी - 12.01.2025 ते 18.01.2025 - 7 दिवस.
• कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी - 19.01.2025 ते 10.02.2025 - 22 दिवस.
• कालवा बंद कालावधी - 11.02.2025 ते 17.02.2025 - 7 दिवस.
• कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी - 18.02.2025 ते 12.03.2025 - 22 दिवस.
• कालवा बंद कालावधी - 13.03.2025 ते 19.03.2025 - 7 दिवस.
• कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी - 20.03.2025 ते 11.04.2025 - 22 दिवस.
• कालवा बंद कालावधी - 12.04.2025 ते 18.04.2025 - 7 दिवस.
• कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी - 19.04.2025 ते 10.05.2025 - 21 दिवस.
कालवा बंद कालावधी - कालवा पूर्णत: बंद
• कालव्यात पाणी सोडण्याचा एकूण कालावधी - 109 दिवस. आणि कालवा बंद एकूण कालावधी - 28 दिवस.
रब्बी हंगामासाठी पाच पाणीपाळया या प्रस्तावित असून लाभक्षेत्रात हंगामात पाऊस, कालव्याच्या तांत्रिक अडचणी इत्यादीमुळे कालवा चालू बंद कालावधीत पूर्व सूचनेशिवाय बदल संभवतो. तरी इच्छुकांनी निर्धारित वेळेत अर्ज करून भातसा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे भातसा धरण व्यवस्थापन विभाग भातसानगरचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

Post a Comment