डोंबिवलीत महावितरणच्या सहायक अभियंत्याला मारहाण; आरोपींना अटक

 


कल्याण: नादुरुस्त वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीत व्यस्त असलेल्या सहायक अभियंत्याला दमदाटी व मारहाणीची घटना डोंबिवलीच्या कैलासनगर-शास्त्रीनगर भागात मंगळवारी (१ ऑक्टोबर) मध्यरात्री घडली. यासंदर्भात विष्णुनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या पाच विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.  

मुकेश पुंडलिक पाटील, रुपेश (पूर्ण नाव माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. उच्चदाब वाहिनीतील बिघाडामुळे मंगळवारी रात्री जुन्या डोंबिवलीतील कैलासनगर-शास्त्रीनगर भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. जुनी डोंबिवली शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता जयेश बेंढारी कर्मचाऱ्यांसह दुरुस्तीचे काम करत या भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू करत होते. सहायक अभियंता बेंढारी हे इंदिरानगर भागाचा वीजपुरवठा पूर्ववत करुन कैलासनगर चौकात आले. त्यावेळी आरोपी मुकेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेंढारी यांना अडवले व अपमानजनक भाषा वापरली. बेंढारी यांनी असभ्य भाषेवर आक्षेप घेतल्यानंतर मुकेश पाटील यांच्यासोबत असलेल्या एकाने बेंढारी यांच्या कानाखाली चापट मारली. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. बेंढारी यांच्या फिर्यादीवरुन दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६ (), ३५१ (), ३५२, ३() आणि १३२ नुसार विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरिक्षक संजय पवार या गुन्ह्याचा तपास करत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत