देशी गायीला राज्यमाता-गोमातेचा दर्जा

 

येऊर येथील गोशाळेत युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी केले गोमातेचे विधिवत पूजन 



ठाणे - देशी गायीला राज्यमाता - गोमाता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या औचित्याने आज येऊर येथील गोशाळेला युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी भेट दिली. या ठिकाणी ब्राह्मणांच्या उपस्थितीत गोमातेची विधिवत पूजा पुर्वेश सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली. 

गाय ही आपल्यासाठी पूजनीय आहे. तिच्या गर्भात ३३ कोटी देवांचा वास असतो. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरात गायींचे पूजन करण्यात येईल. तसेच तिच्या देखभालीसाठी राज्य सरकारने अनुदान देण्याचा निर्णयही घेतला असून त्यामुळे गोमातेचे जतन केले जाईल. 

राज्य सरकारने देशी गायीला राज्यमाता - गोमाता म्हणून मान्यता दिल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याबद्दल पुर्वेश सरनाईक यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.

राज्यभरात युवा सैनिक गोशाळांना भेट देऊन ते गोमातेचे पूजन करतील. तसेच या शासन निर्णयाची प्रत गोशाळांना देण्यात येईल. युवासेनेच्या माध्यमातून या शासन निर्णयाची जनजागृती राज्यभरात करण्यात येईल, अशी माहिती पूर्वेश सरनाईक यांनी दिली. 

यावेळी युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम व नितीन लांडगे, युवासेना पालघर निरिक्षक सिद्धार्थ पांडे, ठाणे जिल्हा सचिव अभिषेक शिंदे, जिल्हा समन्वयक अर्जुन डाबी, विधानसभा निरिक्षक किरण जाधव, ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष देवेंद्र साळवी, युवासेना ठाणे विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, विधानसभा उपाध्यक्ष विकेश भोईर, अशफाक शेख, अमित यादव, राकेश जयस्वाल, युवासनेचे  प्रतिक भालेराव, साई ढवळे, सागर राजपुत, संदीप तिवारी, सोहम सुर्वे, सुजय पाटील, आदेश वाघमारे, युवतीसेना कोअरकमिटी सदस्य पुजा लोंढे यांच्यासह युवासेना पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत