ठाणे शहरातील ग्रामीण शिक्षण मंडळ माजिवडा येथे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेद्वारे मतदान जनजागृती

 


     ठाणे(जिमाका):- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नवमतदार होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील ग्रामीण शिक्षण मंडळ माजिवडा या ठिकाणी मुलांच्याकडून मतदान जनजागृतीपर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

     जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्र बिंदू हा मतदार आहे. या लोकशाहीला अधिक बळकट बनविण्यासाठी प्रत्येक युवक-युवतींनी मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन स्वीप पथकाने उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत