कल्याण ग्रामीण मध्ये शिवसेनेची ‘मशाल’ क्रांती घडविणार जनसंपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी शिवसैनिकांचा निर्धार
डोंबिवली – कल्याण ग्रामीण विधासभा मतदार संघामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा कार्यकर्ता पेटून उठला असून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघामध्ये मशाल निशाणी क्रांती घडविणार असल्याचे कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. गेली पाच वर्षे कल्याण ग्रामीण विकासापासून वंचित राहिला परंतु येत्या निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच उमेदवार निवडून येण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले. लोढा हेवन निळजे येथे कल्याण तालुका विधानसभाक्षेत्र सह संघटक विजय सुदाम भोईर यांच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटन जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, माजी आमदार सुभाष भोईर व जिल्हा संघटिका वैशाली दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
माजी आमदार सुभाष भोईर यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात पाच वर्षात जनतेच्या सुख दुखात आपण सातत्याने सहभागी होत असल्याचे सांगितले. तसेच यापूर्वी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करताना जनतेची प्रामाणिक सेवा केली असून यापुढे देखील जनसेवेसाठी अग्रभागी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर यांनी कल्याण ग्रामीण हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा बालेकिल्ला असून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची मशाल प्रचंड मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर युवा जिल्हा अधिकारी प्रतिक पाटील यांनी सिनेट निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व उमेदवार ज्या पद्धतीने निवडून आले याचा अर्थ सुशिक्षित मतदार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पाठीशी असून येत्या निवडणुकीमध्ये सुशिक्षित युवा व संपूर्ण जनता बदल करण्यास सिद्ध झाली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा विजय निश्चित झाला असल्याचे सांगितले.
या जनसंपर्क कार्यालाच्या उद्घाटन प्रसंगी कल्याण ग्रामीण संपर्क प्रमुख अरविंद बिरमोळे, डोंबिवली शहर प्रमुख अभिजित सावंत, उप तालुका प्रमुख भगवान पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील, युवा सेना उपजिल्हा अधिकारी स्वप्निल पावशे, विभाग प्रमुख नेताजी पाटील, रुपेश पवार, उप विभाग प्रमुख चंद्रहास पान्हेरकर, उप विभाग प्रमुख अभिजित बांदल, पंडीत पाटील, डॉ. मनोज यादव, युवा सेना तालुका अधिकारी जयेश म्हात्रे, युवा सेना उप तालुका अधिकारी आवेश गायकर, शाखाप्रमुख शरद पाटील, अतिश खांडपेकर, युवा सेना उप शाखा अधिकारी राजू पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणावार पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment