श्री जानकादेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उद्घाटन

                                          


ठाणे - वर्तकनगर येथील ग्रामदेवता श्री जानकादेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण घटस्थापना दिनी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले.
वर्तकनगर येथे स्वयंभू श्री जानकादेवीची मूर्ती आहे. शिलाहार राजापासून येथे देवीचे किंवा त्या आधीपासून येथे देवीचे वास्तव्य असल्याचे बोलले जात आहे. नवसाला पावणारी देवी अशीही श्री जानकादेवीची ख्याती आहे. काही वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोध्दार करुन सुबक असे भव्य मंदिर उभारण्यात आले.
नव्याने येथे आता आकर्षक असे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. नवरात्रोत्सव येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधत गुरुवारी दुपारी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले.  
यावेळी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देणगीदार आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.  
श्री जानकादेवी मंडळाचे अध्यक्ष अनंत टेमकर, माजी अध्यक्ष जयसिंग नाईक साटम, उपाध्यक्ष संजय परदेशी, कार्याध्यक्ष सचिन नाईक साटम, चिटणीस हरेश घोगळे, खजिनदार श्रीकृष्ण दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत