आशा कॅन्सर ट्रस्ट तर्फे कर्करोगमुक्त रूग्णांसाठी `रोझ डे' साजरा

 



 ठाणे - आशा कॅन्सर ट्रस्ट तर्फे कर्करोग मुक्त रूग्णांसाठी दि. २९ सप्टेंबर रोजी `रोझ डे'  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १५० हुन अधिक  कर्करोगमुक्त रुग्ण,  नातेवाईक, डॅाक्टर, हॅास्पिटल स्टाफ, पाहुणे कलाकार सर्व मिळुन ३५० च्या वर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. 

आमदार संजय केळकर यांनी दीप प्रज्वलन केले. डॉ. सतीश कामत आणि डॉ. सुनिता कामत यांनी सात्तत्याने चालविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत कर्करूग्णांना सर्वतोपरीने मदत करण्याचे आश्वासन दिले. 

कार्यक्रमाची सुरुवात स्मृती पै हिच्या गणेश वंदनाने झाली. श्री राम स्तुती वर सुरेख नृत्य पैठणकर बहिणींनी केले. अरुणा जोशी यांनी मनसोक्त गाणे गायले तर सुजाता पैठणकर यांनी नृत्य करत इतर रुग्णांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. सत्यवाने राणे यांनी प्रकृतीत सुधारणा झाल्याबद्दल डॉ.  सतीश  कामत यांचे आभार मानले. 
कार्यक्रमाची रंगत रागिनी कवठेकर यांच्या बहारदार गायनाने वाढली. 

डाॅनी हजारीका, केशव बरुवा यांच्या सुगम आवाजाने सर्वांचे मनोरंजन झाले
 .
कवी अरुण म्हात्रे यांच्या हलक्याफुलक्या कवितांनी सगळे आसनावर खिळुन बसले. 
शिव पार्वती विवाहचे वर्णन करत तसेच रामचे स्तवन कथ्थक नृत्य सुंदर सादरीकरण रुपाली भोईर यांच्या नृत्यांगन कला अकॅडमीने केले
 .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत