वागळे इस्टेट मधील डंपिंग हटवा अन्यथा जनआंदोलन करु
प्रतिनिधी - वागळे इस्टेट मधील रोड नंबर २६ येथे कचरा संकलन केंद्र विकसित करण्यात आले होते. परंतु त्या ठिकाणी कचरा संकलन होत नसल्याने शहरातील सर्व कचरा डंपिंग केला जात असून दररोज १००० टन कचरा तेथे साठविला जातो. त्यातील ३०० टन कचरा दुसरीकडे स्थलांतरित केला जातो. परंतु गेले सहा महिन्यापासून तेथून ३०० टनही कचरा बाहेर गेला नसल्याने सदर ठिकाणी अंदाजे एक लाख वीस हजार मॅट्रिक टन कचरा साठला आहे. त्यामुळे तेथील परिसरात दुर्गंधी पसरल्याने वारंवार नागरिकांनी या ठिकाणावरचे डंपिंग हटविण्याकरिता निवेदन आयुक्तांना दिले. परंतु याची कोणतीही दखल न घेतल्याने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे हटवा नाहीतर जनआंदोलन करू असा थेट इशाराच दिला आहे. त्यावेळी शिवसेना उपसंघटक प्रदीप वाघ, प्रवीण उतेकर, उपविभाग प्रमुख रामेश्वर बिचाटे, ठाणे शहर युवा सेना विधानसभा अधिकारी सौरभ निकम, सरचिटणीस जयदीप जाधव, विभाग अधिकारी भावेश कदम, राज वर्मा, राहुल दळवी, जतिन पवार, चिटणीस निखिल पितळे व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment