अतिक्रमण विभागामार्फत बेलापूर, ऐरोली विभागात धडक कारवाई
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने बेलापूर, ऐरोली विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अे विभाग बेलापूर कार्यालया अंतर्गत श्री./श्रीम. सखुबाई कोळी, घर क्र. 494, से.19, बेलापूर नवी मुंबई येथे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
सदर श्री./श्रीम. सखुबाई कोळी, घर क्र. 494, से.19, बेलापूर नवी मुंबई येथील अनधिकृत बांधकाम श्री. शशिकांत तांडेल सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी - बेलापूर, यांचे नियंत्रणाखाली अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन दि.08.06.2024 निष्कासित करण्यात आले.
तसेच आज दि.05.09.2024 रोजी पुन:च्छ् बांधकाम सुरु असले प्रकरणी अंशत: निष्कासित करण्यात आले आहे. या धडक मोहिमेसाठी श्री. शशिकांत तांडेल सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी – बेलापूर, श्री. मयुरेश पवार, कनिष्ठ अभियंता व इतर अधिकारी/ कर्मचारी, मजूर 10, पोकलन – 01, जे.सी.बी.- 01 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सागरनाथ रामा मढवी, घर नं.-30, मच्छी मार्केटच्या मागे, दिवा गाव, सेक्टर – 9, ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. मा. उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र.1591/2023 च्या आदेशानुसार आज रोजी 5 व्या मजल्याचे बांधकाम अंशत: निष्कासीत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
सदर ठिकाणी पोकलन, जेसीबी सारखी मशनरी जावु शकत नसल्याने या मोहिमेसाठी 04 गॅस कटर, 06 हॅमर, 04 ब्रेकर व 25 मजुर यांचा वापर करण्यात आलेला असून मोहिमेकरीता जी विभाग ऐरोली येथील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

Post a Comment