बंगालचे बाऊल आणि अगमनीचे गुजरातीमध्ये सादरीकरण
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत गुजराती साहित्य अकादमी द्वारा फ्लुट अँड फिदर तसेच लोकायन सांस्कृतिक संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'आगमनी अने मस्तराम बाऊल' या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी गोकुल हॉल सायन येथे करण्यात आले होते. या विषयावर अभ्यासपूर्ण माहिती तसेच बांगला गीतांचे गुजरातीमध्ये भाषांतर डॉ. सतीशचंद्र व्यास यांनी केले आहे. शास्त्र जसे आनंद देणारे असते तसे लोककला या स्वानंद देणाऱ्या असतात. मनना मनेर म्हणजे अंतरात्मा त्यासोबत ऐक्य साधणं म्हणजेच बाऊलगान आहे. बाऊल गायकाला सात विशेष गोष्टीत प्रावीण्य मिळविणे आवश्यक असते असे प्रतिपादन डॉ. व्यास यांनी केले.
गीतरचना, स्वरांकन, गीतगायन, तालवादन, स्वरवादन, नृत्य आणि अभिनय या सप्त गुणांचा समन्वय बाउलमधे एकसाथ पाहायला मिळतो. बांगला भाषेतील बाऊल आणि अगमनी या गीतप्रकारातील गीतांचे सादरीकरण गोकुलदास बाऊल आणि श्रबोनी चौधरी यांनी केले तसेच गुजराती भाषेत श्रद्धा श्रिधराणी आणि बिना देसाई यांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमाची संकल्पना आणि स्वरांकन महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष श्री. स्नेहल मुजुमदार यांची होती.
Post a Comment