विजयादशमीनिमित्त `वुमेन बाईक रॅली' सहभागी होण्याचे आवाहन

 


ठाणे - क्रेडाई एमसीएचआय, आशर, रास रंग, ब्युटी ऑन बाईक, अर्चना मनेरा फाउंडेशन, आणि टॅग(मिस/मिसेस ठाणे) या संस्थांच्या विद्यमाने विजयादशमीनिमित्त `वुमेन बाईक रॅली' आयोजित करण्यात आली आहे. `नारी तू नारायणी, महाशक्ती युगे युगे ' या संकल्पनेवर आधारित ही रॅली आहे.
12 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला हिरानंदानी इस्टेट, ठाणे येथून प्रारंभ होईल आणि जकात नाका ग्राऊंड कोपरी, हरिओम नगर, ठाणे येथे शेवट होईल.
या रॅलीमध्ये इतिहासात प्रथमच महिलांसाठी सर्वोत्तम पोशाखांसाठी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यात प्रथम पारितोषिक रु. 5,000, द्वितीय पारितोषिक रु. 2,500 आणि सरप्राइज बक्षीस 1,250 असे असेल. तसेच सुरुवातीच्या आणि शेवटच्या दोन्ही ठिकाणी अल्पोपहार प्रदान केला जाईल. ऊर्जा उच्च ठेवण्यासाठी डीजे, गेम्स आणि गरबा राऊंड असेल, अशी या रॅलीची वैशिष्ट्ये आहे.  
सर्व सहभागींनी योग्य पारंपारिक पोशाख परिधान करणे आवश्यक आहे.
बिल्डिंग ग्रुप स्त्रिया, झुंबा किंवा फिटनेस क्लासेसच्या महिला, महिलांचे सामाजिक गट आणि पोलिस, फायर ब्रिगेड किंवा हॉस्पिटल इंडस्ट्रीमधील महिला यात सहभागी होऊ शकतील. तरी महिलांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
सहभाग नोंदणी आणि अधिक माहितीसाठी अपर्णा (9987890324), समीर (7303110082) यांच्याशी संपर्क साधावा.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट महिला सक्षमीकरण आणि सामर्थ्य साजरे करण्याचा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत