एनएमएमटी मुख्यालयासह आगारांचीही स्वच्छता ही सेवा मोहीमेत सखोल स्वच्छता

                                    

 


नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम अर्थात एनएमएमटीच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा साजरा करण्यात येत असून यामध्ये ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत परिवहन उपक्रमाची बस आगारे, नियंत्रण कक्ष तसेच एनएमएमटी मुख्यालय कचरामुक्त करण्याकरिता 27 व 28 सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीमांचे आयोजन करण्यात आले होते.

या अंतर्गत एनएमएमटी नियंत्रण कक्ष व परिसर 27 सप्टेंबर रोजी स्वच्छ करण्यात आला व 28 सप्टेंबर रोजी परिवहन व्यवस्थापक श्री.योगेश कडुस्कर यांच्या नियंत्रणाखाली नमुंमपा परिवहन उपक्रमातील तुर्भे आगार, आसुडगाव आगार, घणसोली आगार व सीबीडी मुख्यालय येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तुर्भे आगार व्यवस्थापक श्री. सुनिल जगताप, आसुडगाव आगार व्यवस्थापक श्री. भगवान भोईर, घणसोली आगार व्यवस्थापक श्री. निवृत्ती सिताप यांच्यासह तेथील अधिकारी, कर्मचारी, वाहक, चालक, स्वच्छताकर्मी तसेच स्थानिक नागरिक व एनएसएस विद्यार्थी यांनी आगारांचा अंतर्गत व बाह्य परिसर स्वच्छ केला. एनएनएमटी मुख्यालयातही प्रशासन अधिकारी श्रीम. दिपीका पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयीन स्वच्छता केली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत