गणेशोत्सवाचे औचित्य साधत जिजाऊ संस्थेच्या वतीने ५ मोफत रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिजाऊ संस्था आपल्या कुटुंबाप्रमाणे आपली काळजी घेईल – निलेश सांबरे

 


पालघर / विक्रमगड : गणेशोत्सवाचे औचित्य साधत  जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने दुर्गम भागांत असलेल्या गोर गरीब जनतेच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने ठाणेसह पालघर जिल्ह्यातील विविध भागांत ५ मोफत रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या हस्ते झडपोली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात करण्यात आले.

जिजाऊ संस्था ही गेली १५ वर्षे आरोग्य ,शिक्षण ,रोजगार ,महिला सक्षमीकरण आणि शेती या विषयांवर कोकणातील पालघर ,ठाणे ,रायगड ,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ५ जिल्ह्यात  स्वखर्चाने मोफत उपक्रम राबवत समाजसेवा करत आहे . शासन करेल तेव्हा करेल पण समाजाचे एक घटक म्हणुन समाजासाठी योगदान देणे हे आपले देखील कर्तव्य आहे .  म्हणुनच जिजाऊ संस्त्हा जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पोहचुन आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत आहे .याच अनुषांगाने आज कल्याण तालुक्यासाठी २, कसारा येथे १, जव्हार येथे १ आणि पालघर/ सफाळे/नालासोपारा  येथे  १ अश्या ५ मोफत रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिजाऊ संस्थेच्या वतीने करण्यात आल्याचे यावेळी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले .

पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातल्या दुर्गम भागांत जिजाऊ संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत रुग्णवाहिका या गरीबातल्या गरीब रुग्णाकडून एकही रुपया न घेता सेवा पुरवतील असे देखील यावेळी सांबरे यांनी सांगितले . याआधीही २१ रुग्णवाहिका जिजाऊ संस्थेच्या वतीने धुळे जिल्हा तसेच कोकणभर समाजच्या सेवेसाठी देण्यात आलेल्या आहेत.  यात आणखी ५ रुग्णवाहिका आज समाजासाठी मोफत लोकार्पण करण्यात आलेल्या आहेत . एकूण २६ रुग्णवाहिका या जिथे जिथे समाजाच्या सेवेसाठी गरज पडेल तिथे तिथे पुरवण्यात येतील ,त्याचबरोबर जिजाऊ संस्थेशी संपर्क केल्यानंतर संस्थेच्या श्री. भगवान महादेव सांबरे रुग्णालयात गरजू रुग्णाला मोफत उपचार मिळतील तसेच गरज पडल्यास शासकीय रुग्णालयातही जिजाऊ कडून उपचार मिळवून देण्यासाठी जिजाऊचे स्वयंमसेवक आपल्या मदतीला असतील असे सांबरे यांनी यावेळी आश्वासित केले. 

उपचारासाठी लाखो रुपयांची बिले भरण्याकरीता हतबल न होता जिजाऊ संस्थेचे सहकार्य घ्या ही संस्था आपल्या कुटुंबाप्रमाणे आपली काळजी घेईल असे आवाहन सांबरे यांनी नागरिकांना या निमित्ताने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत