अंबरनाथ व मोहने १०० केव्ही उपकेंद्रावरील काही भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी बाधित
कल्याण: महापारेषणच्या पडघा ते अंबरनाथ या अतिउच्च दाब वाहिनीवर शुक्रवारी (१३ सप्टेंबर २०२४) सकाळी ८ ते १० दरम्यान तुटलेल्या इन्सुलेटर स्ट्रिंगची दुरुस्ती करण्याचे अत्यंत तातडीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी अंबरनाथ १०० केव्ही व मोहने १०० केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या महावितरणच्या काही भागाचा वीजपुरवठा या कालावधीत बाधित होणार आहे. संबंधित ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
अंबरनाथ १०० केव्ही उपकेंद्रावरील चिखलोली, सर्वोदय नगर, वसद, जांभुळ, आंबेशिव, वडवली, लादी नाका, गणेश चौक, बुवापाडा, संघटन चौक, फॉरेस्ट नाका, हेंद्रेपाडा, बाजारपेठ, एरंजाड गाव, सोनिवली, बारवी डॅम, बदलापूर गाव, दत्तनगर, सिद्धार्थनगर, बेलवली, सुभाषनगर, पोखरकर नगर, शांतीनगर, विद्यापीठ रोड, पवार सेक्शन, चिखलोली पाडा, गणेश घाट, कात्रप गाव, मोहन हायलँड, आयटीआय, एमजेपी, केमीकल एमआयडीसी, उल्हासनगर-४, अंबरनाथ पूर्व, कानसई गाव, भिडेवाडी, नवरेनगर, म्हाडा लोकनगरी, कैलासनगर, महालक्ष्मी नगर, शिरगाव या भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी ८ ते १० दरम्यान बंद राहणार आहे.
तर मोहने १०० केव्ही उपकेंद्रावरील गोवेली, सी ब्लॉक, उल्हासनगर कँप-१ आणि कँप-२, एमआयडीसी वॉटर वर्क्स, उल्हासनगर पाणीपुरवठा, शहाड, मोहने, अटाळी, गाळेगाव, मांडा, आंबिवली आदी भागात शुक्रवारी सकाळी ७ ते १ दरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे.

Post a Comment