नागरीकांसाठी किटकजन्य रोग व साथरोगाची विशेष शिबीरांचे आयोजन




          नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मा. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हिवताप / डेंगी, जलजन्य  व साथरोग आजारांबाबत जनजागृती होणे करीता जाहिर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

         याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सव कालावधी मध्ये मोठ्या गणपती मंडळांमध्ये              दिनांक. 14/09/2024 ते दिनांक 16/09/2024 या कालावधीत सायंकाळी 6 ते 9 या वेळेत हिवताप / डेंगी आजाराबाबत जनजागृती होणे करीता विषेश शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरांकरीता एकुण 30866 नागरीकांनी भेट दिले असुन एकुण 454 नागरीकांचे रक्तनमुने घेण्यात आले असता, तपासणी अंती सदरचे रक्तनमुन Negative असल्याचे आढळुन आले आहेत.

        त्याअनुषंगाने कार्यक्षेत्रात जास्तीच जास्त नागरीकांपर्यंत पोहोचुन जनजागृती करणेकरीता             दि. 25/09/2024 रोजी खालील प्रमाणे विशेष जाहीर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

1     सी बी डी - बेलापूरगाव, राम मंदिराच्या  समोरील शेड.

2     करावे - साईबाबा मंदिर, करावेगाव.

3     से-48 - हनुमान मंदिर, गावठाण किल्ला.

4     नेरुळ 1      - बेल क्वारी, एम आय डी सी, नेरूळ.

5     नेरूळ 2      - ओम बालाजी बिल्डींग, वत्सला अपार्टमेंट जवळ, नेरूळगाव.

6     कुकशेत - हजेरी शेड, एल मार्केट समोर, सेक्टर-8, नेरुळ.

7     शिरवणे - गावदेवी चौक, पेट्रोल पंप जवळ, सेक्टर २४.

8     सानपाडा - जेष्ठ नागरिक  विरुंगुळा केंद्र,  सेक्टर 13.

9     तुर्भे - आरंभ ट्रस्ट, के के रोड , तुर्भे.

10    पावणा - नवी मुंबई महानगरपालिका, शाळा क्र. ३३, पावणे गाव.

11    इंदिरानगर - DHR Export. D.399/1, MIDC

12    जुहुगाव - सप्तगिरी सोसायटी, सेक्टर.०९ वाशी.

13    वाशीगाव - मंगलमूर्ती अपार्टमेंट, मच्छी मार्केट जवळ, सेक्टर. ०१ वाशी.

14    खैरणे - सेक्टर 8, नवी मुंबई महानगरपालिका, दैनंदिन बाजार, भूखंड क्रमांक 40, कोपरखैरणे.

15    महापे - अडवली भूतावली गाव , मराठी शाळेजवळ.

16    घणसोली - घणसोली, चींचआळी मच्छी मार्केट.

17    राबाडा - सेक्टर 10 ,वैशाली हॉस्पिटल, ऐरोली.

18    कातकरीपाडा - कातकरीपाडा, क्रांतीचौक, हनुमान मंदिर, सभामंडप.

19    ऐरोली - गावदेवी मंदिर, ऐरोली गाव, ऐरोली.

20    चिंचपाडा - हनुमान मंदिर, गवतेवाडी.

21    दिघा - साईनाथ वाडी, देवा अपार्टमेंट, ऐरोली.

22    इलठणपाडा - रामनगर,अंगणवाडी.

23    नेासीलनाका - साईबाबा मंदिर, अर्जुनवाडी.

24    घणसोली से-4 - टेमटेशन हॅटेल जवळ, सेक्टर ०९, घणसोली.

   

          उपरोक्त तक्त्यामध्ये नमुद ठिकाणी सर्व तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात येणार आहेत तसेच हिवताप / डेंग्यु, जलजन्य व साथरोग या आजारांबाबत माहिती देण्यात येणार आहे. शिबिरांची वेळ सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 वाजे पर्यंत आहे.

         हिवताप / डेंग्यु, जलजन्य व साथरोग आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरीकांच्या प्रत्यक्ष सहभागाची आवश्यकता असुन, नमुंमपा कार्यक्षेत्रातील नागरीकांनी शिबिरांचा लाभ घ्यावा व ताप असल्यास रक्ताची तपासणी करुन घ्यावी तसेच हिवताप / डेंग्यु, जलजन्य व साथरोग आजाराबाबत माहिती घ्यावी असे आवाहन मा. आयुक्त, डॉ. कैलास शिंदे, यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत