ठाण्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का मेघनाथ घरत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल

 


ठाणे : ठाणे घोडबंदर- बाळकूम भागातील शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक देवराम भोईर आणि संजय भोईर यांचे कट्टर समर्थक मेघनाथ घरत यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदीप लेले, मनोहर डुंबरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, युवा मोर्चाचे सूरज दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.. घरत यांचा भाजप प्रवेश शिवेसना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

मेघनाथ भोईर यांनी बाळकूम, कोलशेत परिसरात शिवसेनेचे संघटन तयार केले होते. ठाणे महापालीकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता.  यावेळी मेघनाथ घरत म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी,महाराष्ट्रातील कर्तव्यनिष्ठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ठाणे जिल्ह्यातील आगरी कोळी भूमिपुत्रांचे आधारस्तंभ गणेश नाईक, संजीव नाईक,ठाणे शहराचे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे आणि आमदार  यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन मी आज भाजप पक्षामध्ये प्रवेश करत आहे स्थानिक राजकारणाला कंटाळून आणि स्वार्थी लोकप्रतिनिधींच्या विचारधारीला सोडून सर्व व्यापक विचारधारा असलेल्या कार्यपद्धतीवर काम करण्याची माझी इच्छा असल्यामुळे मी भाजपात प्रवेश केला आहे ठाणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही ओबीसी चळवळीच्या माध्यमातून सतत काम करत असतो करतही राहू परंतु चळवळीला धार देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती ची गरज असते तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी भाजप माझे हात बळकट करेल असा मला ठाम विश्वास वाटतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत