ठाण्यात नवरात्री पूर्वीच ' हालो रे ' प्री नवरात्री 24 मध्ये गरबा रंगला

 


ठाणे - सगळ्याच दांडिया, गरबा प्रेमींनी आता नवरात्रोत्सव चे वेध लागले असतानाच ठाण्यात चार दिवसांपूर्वीच मोठ्या जल्लोषात गरबा रंगला. अवघा एनकेटी कॉलेजचा सभागृह दणाणून गेला होता. कारण होते ठाणेकर असलेला प्रसिद्ध कोरिओग्राफर रोनक छेडा तसेच धवल ठक्कर यांनी ठाण्यात पहिल्यांदाच " प्री नवरात्री - 24" चे आयोजन केले होते.
    नवरात्रीला आता काही दिवस शिल्लक असताना गरबा प्रेमी सरावात गुंतले आहेत. मात्र ठाण्यात पहिल्यांदाच " हालो रे " प्री नवरात्र - 24 चे आयोजन करण्यात आले होते. ठाण्याच्या एनकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात 20 सप्टेंबर रोजी रंगलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध कोरिओग्राफर रोनक छेडा तसेच धवल ठक्कर यांनी केले होते. ठाण्यासाठी नव्या असलेल्या या कन्सेप्टला ठाणेकरांनी जोरदार पाठिंबा दिला. या गरब्याचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे नावाजलेला ढोलक वादक निखिल धावडे. अप्रतिम ठेक्याच्या वादनाने अवघा सभागृह दणाणून सोडला. तर मनोज परमार आणि अशिता देडीया यांनी आपल्या सुमधुर आवाजाने या कार्यक्रमाला चार चाँद लावले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत