शिक्षा व जनसेवा संस्थेच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप 20 हून अधिक सरकारी शाळांमधील 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ
ठाणे - प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही ठाणे जिह्यातील शिक्षा व जनसेवा संस्था या सामाजिक संस्थेने मोठ्या संख्येने शासकीय शाळा व अंगणवाडी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. याचा लाभ 20 हून अधिक सरकारी शाळांमधील 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना झाला.
ठाणे जिह्यातील मुरबाड तालुका क्षेत्रातील विविध गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाड्या (डोंगरवाडी, करपतवाडी, फंगणे, पेजवाडी, भोईरवाडी, आवळगाव, न्याहाडी, मोरोशी, उदलडोह, दिवाणपाडा, निवगुणपाडा व भोरनंदा) येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे (जसे वह्या, पेन, पेन्सिल, कंपासबॉक्स) वाटप करण्यात आले.
सरकारी शाळांमध्ये शिकणाऱया मुलांना चांगल्या सुविधा देण्याचा संकल्प शिक्षा व जनसेवा संस्थेने केला आहे. दरवर्षी संस्था नवीन शाळांची निवड करून शाळेत डेस्क बेंच उपलब्ध करून देते तसेच मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करते.
1500 हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. याच अनुषंगाने भाईंदर-मोरपाडा-डहाणू, मुरबाड जिल्हा परिषद शाळांमधील याच परिसरातील इतर अनेक शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
या शैक्षणिक वर्षात एकूण 2500 ते 3000 गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचे नियोजन संस्थेने केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष सीए अखिलेश पांडे यांनी सांगितले की, यावर्षी शैक्षणिक साहित्य वाटपाच्या निमित्ताने पंडित विजय शंकर पांडे आणि इतर सहकाऱयांनी उत्तर प्रदेशातील जौनपूर जिह्यात संस्थेचे प्रतिनिधित्व करताना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. ठाणे जिह्यातील मुरबाड येथे स्वयंसंस्थेचे अध्यक्ष अखिलेश पांडे, सदस्य रितेश पांडे व इतर सहकारी कांची पांडे, अशोक केदार पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
Post a Comment