एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत कौपरखैरणे येथील निसर्गोद्यानात 100 हून अधिक देशी वृक्षरोपांची लागवड
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ राबविले जात असून ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामधील एक महत्वाचा उपक्रम ‘एक पेड माँ के नाम’ हा असून या अंतर्गत वृक्षारोपण करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविताना त्यामध्ये लोकसहभागावर भर दिला जात असून ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत आपल्या आईविषयी मनात असलेले प्रेम अधोरेखीत करीत सेक्टर 14, कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.
आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारे वृक्षारोपण देशी वृक्षरोपांचेच करण्यात येत असून त्यानुसार आज वड, पिंपळ, आंबा, करंज, जांभूळ. बहावा अशा शंभरहून अधिक देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहयोगाने राबविलेल्या या ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमात उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री. दिलीप नेरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आणि कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सुनिल काठोळे, सहाय्यक उद्यान अधिकारी श्री भालचंद्र गवळी, स्वच्छता अधिकारी श्री. राजूसिंग चव्हाण तसेच उद्यान विभागातील सर्व उद्यान सहाय्यक आणि कोपरखैरणे इच्छापूर्ती मंडळाचे अध्यक्ष श्री. पालवे व आदिशक्ती सामाजिक संस्था कोपरखैरणेचे अध्यक्ष श्री. जयराम मुकादम आणि त्यांचे संस्था सदस्य तसेच महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माझी वसुंधरा शपथ घेण्यात आली.
Post a Comment