स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतीगृहाच्या नुतनीकृत वास्तूचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

 



        ठाणे  : ठाणेकरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी विनामूल्य सुविधा स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसुतीगृह आणि डायलिसिस केंद्राच्या रूपाने मिळाली आहे. चांगल्या कामासाठी मुख्यमंत्री निधी खर्च झाला याचे समाधान मला या लोकार्पण सोहळ्यामुळे मिळाले आहे, असे प्रतिपादन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले.


        ठाणे महानगरपालिकेच्या, वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर भागातील जुन्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतीगृह आणि डायलिसिस केंद्राच्या अद्ययावत नुतनीकृत वास्तूचे लोकार्पण मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले. या इमारतीचे काम संरचनात्मक दुरुस्ती करून पूर्ण झाले आहे. सर्व सोयींनी युक्त असे वातानुकूलित प्रसुतीगृह आणि डायलिसिस केंद्र नागरिकांसाठी खुले झाले आहे.  


        या कार्यक्रमास, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक राम रेपाळे, दिलीप बेतकर, माजी नगरसेविका जयश्री फाटक, सुखदा मोरे, नम्रता फाटक, अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त उमेश बिरारी, मनीष जोशी, जी. जी. गोदेपूरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


        प्रसुतीगृहाची वास्तू अतिशय सुंदर तयार केली आहे. व्यवस्थाही अद्ययावत दिल्या आहेत. त्यांची काळजी घेणे आणि नीट वापरणे यांची जबाबदारी येथील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांची आहे. मी कधीही अचानक पुन्हा भेट देईन तेव्हा हे प्रसुतीगृह मला याच स्थितीत दिसले पाहिजे, अशी अपेक्षा याप्रसंगी मुख्यमंत्री महोदय यांनी व्यक्त केली.


         श्रीनगरमधील मातोश्री गंगुबाई शिंदे रुग्णालयासाठी नवीन इमारत घेण्यात येत आहे. त्यामुळे तेथेही रुग्ण खाटा वाढणार आहेत. याचा लाभ नागरिकांना होणार आहे. हॉस्पिटलच्या बिलाची नागरिकांनी चिंता करायची नाही. ती चिंता सरकार करत आहे. महात्मा फुले योजनेत राज्याची सर्व लोकसंख्या पात्र केलेली आहे, असेही मुख्यमंत्री महोदय म्हणाले.


            प्रशिक्षण नियुक्ती पत्रे प्रदान


       मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत पात्र ठरलेल्या १० प्रातिनिधिक प्रशिक्षणार्थींना ठाणे महापालिकेतील प्रशिक्षण नियुक्ती पत्रे प्रदान मा. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते याच सोहळ्यात देण्यात आली. त्यात एका दीव्यांग युवकाची समावेश होता. ठाणे महापालिकेत ५४३ तर परिवहन सेवेत १७२ युवकांना अशाप्रकारे प्रशिक्षण नियुक्ती दिली जाणार आहे. अशा प्रशिक्षणार्थींना दरमहा प्रशिक्षण भत्ता देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे मा. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


        या प्रसंगी, मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्तम वास्तू व व्यवस्था उभी केल्याबद्दल नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे, फेरफॅक्स इंडिया, सीएसबी बँक आणि अपेक्स किडनी केअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.


        स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसुतीगृह आणि डायलिसिस केंद्र


       ठाणे महापालिका क्षेत्रात माता बाल संगोपन कार्यक्रम राबविताना येणाऱ्या विविध अडचणींचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना ही राबवण्यात येत आहे.   या योजनेअंतर्गत माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट प्रतीच्या सेवा देण्यासाठी प्रसूतीगृहांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. वागळे प्रभाग समिती अंतर्गत १० खाटांचे स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतीगृह मागील तीस वर्षापासून कार्यान्वित आहे.  या इमारतीचे बांधकाम जुने असल्याने या ठिकाणी पाण्याची गळती तसेच फ्लोर स्लॅब पडणे यामुळे नादुरुस्त झाली होती. मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेअंतर्गत सुमारे तीन कोटी ७८ लाख रुपये खर्च करून या वास्तूचे मजबुतीकरण व बळकटीकरण करण्यात आलेले आहे.


        स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसतीगृह येथे आता, ०७ खाटांचा ए.एन.सी. वॉर्ड, १० खाटांचा पी. एन .सी. वॉर्ड, दोन खाटांची रिकवरी रूम, न्यू बॉन्सेबलायझेशन युनिट, लेबर रूम, मॉड्युलर ओटी (अद्यावत शस्त्रक्रिया गृह), ओपीडी, प्रयोगशाळा तपासण्या, सोनोग्राफी तपासणी, सात खाटांचे डायलिसिस केंद्र या सुविधांचा समावेश आहे.


        त्याचबरोबर, माता बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत दररोज प्रसूतीविषयक सेवा,  नॉर्मल व सिझेरियन प्रसूतीकुटुंब कल्याण शस्त्रक्रियाकुटुंब कल्याण साधनेमहिलांच्या आजारासंबंधित दैनंदिन स्त्री रोग तज्ज्ञ यांच्याद्वारे कन्सल्टेशनगरोदर मातांच्या रक्त चाचण्या,गरोदर मातेची सोनोग्राफी तसेच प्रसूती पश्चात द्यावयाच्या सेवा नवजात शिशुची काळजी घेण्यासाठी न्यू बॉर्न स्टेबलायझेशन युनिट ज्यामध्ये फोटोथेरेपीबेबी वॉर्मर यासुविधा उपलब्ध होणार आहेत. 


      तसेच या ठिकाणी सात खाटांचे डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येत आहे . याकरिता डायलिसिस मशीन या सीएसआरच्या माध्यमातून फेरफॅक्स इंडिया व सीएसबी बँक यांच्यामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.   हे डायलेसिस केंद्र हे मेसर्स अपेक्स किडनी केअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत चालवण्यात येणार असून डायलिसिसच्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत