आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन

 




ठाणे: गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या संकल्पनेतून व शिव आरोग्य सेनेचे ठाणे जिल्हा समन्वयक एकनाथ अहिरे यांच्या वतीने या महाआरोग्य शिबिराचे आयोज करण्यात आले होते. या शिबिराला  शिवसेना नेते मा.खासदार राजन विचारे,शिव आरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर ,महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र दगडु सकपाळ,शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे,माजी उपमहापौर (ठा.म.पा.) नरेशजी मणेरा,शिव आरोग्य सेना नवी मुंबई समन्वयक श्री.प्रताप गाथे,शिवसेना ठाणे शहर सह सचिव विश्वास निकम,शिवसेना ठाणे शहर सह समन्वयक राम काळे,महिला आघाडी ठाणे जिल्हा संघटक  रेखा खोपकर  महिला आघाडी उप जिल्हा संघटक आकांशा राणे,शिवसेना शहर प्रमुख प्रदिप शिंदे,शिव आरोग्य सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ.प्रशांत भुईंबर,डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष डॉ.राकेश यादव, चंदनवाडी  शिवसेना शाखाप्रमुख  तानाजी कदम, कार्यालय प्रमुख  संदिप राणे आणि निलेश पाष्टे,आदींसह मान्यवर उपस्थित होते.

 शिवसेना शाखा चंदनवाडी ठाणे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित शिव आरोग्य सेना (ठाणे जिल्हा) तसेच हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना शाखा चंदनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर संपन्न झाले हे आरोग्य शिबिर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच ठा.म.पा.(सार्वजनिक आरोग्य विभाग) आणि झेडुज यांच्या मार्फत घेण्यात आले होते.या शिबिरात स्त्री रोग,अस्थीरोग,त्वचा रोग,सामान्य तपासनी,मेमोग्राफी,लिव्हर(यकृत) सोनोग्राफी इत्यादी उपस्थित रुग्णांच्या तपासणी करण्यात आली, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टरर्स,परिचारिका,स्टाफ त्याचप्रमाणे ठा.म.पा. (सार्वजनिक आरोग्य विभागाचे) टेक्नीशियन,परिचारिका इतर स्टाफ तसेच झेडुज या कंपनीचे टेक्नीशियन तसेच ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.कैलास पवार,आणि ठा.म.पा.सार्वजनिक आरोग्य विभागाचे डॉ. वर्षा ससाने व मेमोग्राफी युनिटच्या डॉ समिधा गोरे यांचे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह संघटक राजेंद्र शिंदे.विधानसभा पदाधिकारी सचिन त्रिवेदी,अजित चव्हाण,अजिम शेख,देवशी राठोड,उल्हास शिवणेकर,अक्षता पांचाळ,सुरेश भोसले, उपशहरप्रमुख वसंत गव्हाळे,विभाग प्रमुख-जिवाजी कदम, प्रकाश पायरे,महिला विभाग संघटक देशपांडे मॅडम,उपविभागप्रमुख- दत्ता सावंत,सुभाष वालगुडे,रविंद्र मोरे,सुरेश सावंत,हरिश्चंद्र काळे,मनोज गुप्ता,दत्ता जाधव. शाखाप्रमुख- ज्ञानेश्वर बागवे,धोंडीराम मोरे,भास्कर शिर्के,सचिन कार्डिले,दिनेश खाडे, डिजीटल शाखा प्रमुख अभिजीत कदम, महिला शाखाप्रमुख सौ.सुर्वना कंद उपशाखाप्रमुख सौ.संगीता दानवले,हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अनिल ढोपे, रमेश वर्तक,हरिश्चंद्र मांडवकर आदींनी विशेष मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत