जिजाऊ निलेश सांबरेंना बांधली हजारो बहिणींनी प्रेमाची राखी
वाडा: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षी एक राखी समाजकार्यासाठी या संकल्पनेखाली विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या निवासस्थानी एक अनोखे रक्षाबंधन पार पडते . याही वर्षी या रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कुठेलेही रक्ताचे नाते नसताना केवळ सामाजिक जाणीवेच्या भावनेतून पालघर जिल्ह्यात असलेल्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली गावाच्या जिजाऊ नगरीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक राखी समाजकार्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून निलेश सांबरे या आपल्या आपुलकीच्या नात्याने बांधलेल्या भावासाठी ठाणे, मुंबई, पालघर,रायगड, रत्नागिरी आणि अगदी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून हजारोंच्या संख्यने बहिणी रक्षाबंधन करायला या ठिकाणी आलेल्या होत्या . त्यामुळे हा सोहळा पाहताना बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेला हा दिवस खऱ्या अर्थाने झडपोलीतील जिजाऊ नगरीत आज संपन्न झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे. याहीवर्षी हजारोंच्या संख्यने तीच बहिणींची आपुलकीची गर्दी निलेश सांबरे यांना रक्षाबंधन करण्यासाठी जमलेली पाहायला मिळाली.
जिजाऊ शैक्षणीक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली १५ आरोग्य , शिक्षण , रोजगार , महिला सक्षमीकरण आणि शेती या पंचसूत्रीवर संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे स्व :खर्चाने कार्य करत आहेत. या माध्यमातून अंनेक मोफत उपक्रम ते राबवत आहेत . ज्याचा लाभ अनेक नागरिकांना होत आहे. तर महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत आजवर हजारो स्त्रियांना जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी भावासारखे पाठीशी खंबीरपणे उभे राहत आधार दिला आहे . त्यांना स्वयंम रोजगाराचे मोफत प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी पाठबळ देत सहकार्य केले आहे. अनेक महिलांचे कोलमडलेले संसार त्यांनी उभे केले आहेत . अनेक अश्या समाजिक जाणीवेच्या नात्यातून बांधलेल्या बहिणींच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली आहे . याच निस्वार्थी समाजकार्याची , केलेल्या मदतीची जाणीव ठेवून दरवर्षी अश्या हजारो महिला निलेश सांबरे यांना राखी बांधण्यासाठी येत असतात . याहीवर्षी तीच हजारो बहिणींची गर्दी निलेश सांबरे यांच्या निवासस्थानी पाह्यला मिळाली .
यावेळी उपस्थित महिलांना जिजाऊ शैक्षणीक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक भाऊ म्हणून आपण सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासन निलेश सांबरे यांनी उपस्थित असलेल्या प्रत्येक बहिणीला देउन मायेची भेट देत त्यांच्या बरोबर भोजन करत आपल्या लाडक्या बहिणीची आपुलकीने पाठवणी केली.


Post a Comment