हेल्थकॉन हाफ मॅरेथॉनव्दारे डॉक्टरांनी प्रसारित केला ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’चा आरोग्यपूर्ण संदेश

 


 

          स्वच्छ भारत मिशनच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ’सफाई अपनाओबिमारी भगाओ’ अभियानास जागतिक डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून 1 जुलैपासून प्रारंभ करण्यात आला असून नमुंमपा आयुक्त डॉकैलास शिंदे यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता आणि आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत.

          अशाच प्रकारचा हाफ मॅरेथॉनचा अभिनव उपक्रम ’हेल्थकॉम’ या वैद्यकीय क्षेत्रात काम करणा-या डॉक्टरांच्या  संघटनेच्या माध्यमातूनलेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगानेनवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरूळ जिमखाना ते नमुंमपा मुख्यालय ते परत नेरूळ जिमखाना अशा स्वरूपात राबविण्यात आलामहापालिका आयुक्त डॉकैलास शिंदे यांनी झेंडा दाखवून या ’हेल्थकॉम हाफ मॅरेथॉनचा शुभारंभ केला.

          यावेळी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्रीसुनिल पवारवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉप्रशांत जवादे,  घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉअजय गडदेपरिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा  वित्त अधिकारी श्रीतुषार दौंडकरक्रीडा विभागाच्या प्रउपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रेसहाआयुक्त तथा विभाग अधिकारी श्रीशशिकांत तांडेल  डॉअमोल पालवेकार्यकारी अभियंता श्रीराजेश पवार तसेच हेल्थकाॅन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामलेट सेलिब्रेट फिटनेस संस्थेच्या प्रमुख श्रीम.रिचा समितनेरुळ जिमखाना अध्यक्ष श्री.शशी पांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

          केंद्र  राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ’सफाई अपनाओबिमारी भागाओ’ अभियान स्वच्छतेप्रमाणेच आरोग्य विभागाशी निगडीत आहेविशेषत्वाने पावसाळी कालावधीत उद्भवणारे जलजन्य आणि किटकजन्य आजार उद्भवूच नयेत यादृष्टीने करावयाचे प्रतिबंधात्मक उपचार  घ्यावयाची काळजी या अनुषंगाने अभियानांतर्गत स्वच्छता  आरोग्य विषयक व्यापक जनजागृती केली जात आहे तसेच सखोल स्वच्छता मोहीमा राबवूनडासनाशक फवारणी करूनआरोग्य तपासणीवर भर देऊन रोगप्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे.

          याकामी डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्वाची असून त्यादृष्टीने हेल्थकॉन या डॉक्टरांच्या राष्ट्रीय संस्थेने पुढाकार घेऊन लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगाने हेल्थकॉन हाफ मँरेथॉन आयोजित केली होतीसकाळी 5.30 वा. 21 किमी अंतराच्या हाफ मँरेथॉनला प्रारंभ झालात्यानंतर 10 किमी 5 किमीमॅरेथॉन घेण्यात आलीयामध्ये 500 हून अधिक डॉक्टर्स उत्साहाने सहभागी झाले होतेविशेष म्हणजे या हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याकरिता दिल्लीसह इतर राज्यातून 150 हून अधिक डॉक्टर्स आले होते.   

          या हेल्थकाॅन हाफ मॅरेथाॅनमध्ये नवी मुंबईतील डॉक्टरांनी विविध पारितोषिके संपादन करीत उल्लेखनीय कामगिरी केलीयामध्ये डॉअनिता बजाज 21 कि.मीअंतराच्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्या ठरल्याडॉचेतन सिंघलडॉ.अमित घरतडॉनचिकेत जाधव यांनी 21 किलोमीटरच्या मॅरेथॉन मध्ये पारितोषिके संपादन केलीतसेच दहा कि.मीअंतराच्या मॅरेथॉनमध्ये डॉप्रवीण गायकवाडडॉआरती गायकवाडडॉवैशाली लोखंडेडॉकेतकी दवे यांनी पारितोषिके पटकावली.

          हेल्थकॉन हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणा-या सर्व धावपटू डॉक्टर्सना मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आलेतसेच प्रत्येक वयोगटातील विजेत्या पहिल्या 3 क्रमांकांच्या पुरूष  महिला धावपटूंना सन्मानचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले.

          विशेष म्हणजे या ठिकाणी मान्यवरांच्या स्वागतासाठी पर्यावरण आणि आरोग्य या दोन्ही दृष्टीने उपयुक्त अशी फळांची करंडी स्नेहभेट म्हणून देण्यात आली.

          ’सफाई अपनाओबिमारी भगाओ’ हे अभियान आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे असलेले महत्व दर्शविणारे आहेत्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची जपणूक करणारे डॉक्टर्सच स्वच्छतेचे महत्व सांगत हेल्थकॉन हाफ मॅरेथॉनमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश प्रसारित करीत 'रन फॉर हेल्थम्हणत स्वतधावले तेव्हा निश्चितच या उपक्रमाला नवा आयाम लाभलेला दिसून आला.  हेल्थकॉन हाफ मॅरेथॉनव्दारे डॉक्टर्सच्या माध्यमातून स्वच्छतेचा  आरोग्य रक्षणाचा संदेश गांभीर्याने प्रसारित झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत