जिजाऊ संस्थेच्या २१ अभ्यासिकांमधून निघणार शैक्षणिक दिंडी

 


*ठाणे :* जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यामातून आषाढी एकादशीचे औचित्य साधत जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या एकूण २१ अभ्यासिकेच्यावतीने आज येथील विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे . 


जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही गेली १५ वर्ष शिक्षण , आरोग्य, रोजगार ,शेती व महिला सक्षमीकरण या मुद्यांवर कार्य करत आहे . संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे ही कोणाकडून कसलीही देणगी न घेता स्व:खर्चाने संस्थेचे सर्व उपक्रम गोरगरीबांसाठी राबवत आहेत .


समाजातल्या गुणवत्ता असलेल्या

गोर गरीब मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने ठाणे शहरात संस्थेच्या वतीने २१ अभ्यासिका चालवल्या जातात. महागड्या क्लासेसची फी भरू ण शकणाऱ्या अनेक मुलांना या अभ्यासिकेच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन दिले जाते . तसेच त्यांना करियर विषयक मार्गदर्शनही केले जाते . अधिक गुणवत्ता असलेल्या व उच्च शिक्षण घेऊ इच्छिणा-ऱ्या मुलांनाही संस्थेच्या वतीने पाठबळ दिले जाते. शिक्षणाची ही गंगा जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहचावी या उद्देश्याने जिजाऊ संस्थेच्या एकूण २१ अभ्यासिकेतील मुलांना घेऊन  आज शैक्षणिक दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे . 



त्याचबरोबर संस्थेच्या वतीने आषाढी एकादशीनिमत्त निलेश सांबरे यांच्यावतीने शहापूर ते पंढरपूर दि. 16, 17 व 18 जुलै या तीन दिवशी पंढरपूरला विठूमाऊलीच्या दर्शनासाठी जाऊ इच्छीणाऱ्या भाविकांसाठी  मोफत बस तसेच भोजनाची आणि निवासाची सोय  करण्यात आली आहे.  तसेच या भाविकांसोबत जिजाऊ संस्थेच्या श्री. भगवान महादेव सांबरे या रुग्णालयातील ५ डॉक्टर , ४ नर्स तसेच दोन रुग्णवाहिकेची सेवा देखील पुरवण्यात आली आहे. यावेळी सर्व भाविकांची मोफत तपासणी करून त्यांना गरज भासल्यास मोफत औषधे देखील पुरवण्यात येत आहेत. गेल्या १० वर्षांपासून पासून एम्बुलेंस व डॉक्टर आणि नर्सेसची टीम ही  निलेश सांबरे ह्याच्या जिजाऊ संस्थेकडून वारकरी एकादशी निम्मित पंढरपुरमधे येणाऱ्या लाखो भक्तांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी पुरवण्यात येत आहे.


“ गरीबीतून वर यायचे असेल तर शिक्षण हा एकमेव पर्याय आहे . आपण उच्च शिक्षण घेऊन आपली व समाजाची परिस्थिती बदलू शकतो . समाजाला दिशा हवी असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच आज शैक्षणिक दिंडीचे आयोजन करून या माध्यमातून हा संदेश आम्ही पोहचवत आहोत ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी अडचण येईल त्या त्या ठिकाणी जिजाऊ संस्था त्यांच्या पाठीशी उभी राहिला असा विश्वास यावेळी सांबरे यांनी व्यक्त केला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत